Kidnapping of 4 year old boy in Amravati  
विदर्भ

धक्कादायक! आजीसोबत फिरणाऱ्या चार वर्षीय चिमुकल्याला घेऊन युवक पसार; तब्बल २० तास उलटूनही पत्ता नाही 

संतोष ताकपिरे

अमरावती ः शहरातील व्यापारी कुटुंबातील चार वर्षीय चिमुकल्याचे अपहरण करणारे वीस तासांनंतरही सापडले नाहीत. परंतु अपहरणकर्ते पोलिसांच्या रडारवर असल्याचा दावा पोलिसांनी केला. लहान मुलाचे अपहरण कशासाठी केल्या गेले, ही बाब अद्यापही गुलदस्त्यातच आहे.

चिमुकल्याच्या अपहरणाच्या घटनेमुळे रात्रभर पोलिसांनी अनेक ठिकाणी झडती घेतली. पहाटेपासून पुन्हा शोधकार्य सुरू झाले. नयन लुणीया (वय चार वर्षे, रा. शारदानगर), असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे. बुधवारी (ता. 17) रात्री आठच्या सुमारास नयन हा त्याच्या आजीसोबत रस्त्याने फिरत होता. एका शाळेपासून काही फूट अंतरावर एक दुचाकी थांबली, त्यावर युवक व युवती असे दोघे होते. युवक त्या मुलाजवळ आला आणि आवाज देऊन त्याला उचलले. त्यानंतर महिलेसह दुचाकीवरून पसार झाले. 

आपल्या लहान भावाला कुणीतरी उचलून नेत असल्याचे छोट्या बहिणीने बघितले. ती ओरडल्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी धाव घेतली. परंतु तोपर्यंत शारदानगर परिसरातून अपहरणकर्ते चिमुकल्याला घेऊन पसार झाले. युवक-युवतीने दुचाकीवर बसवून नयनला रवीनगर येथील श्रीमाळी प्लाझा या व्यापारसंकुलापर्यंत आणले. येथून एका ऑटोत बसून मुलासह निघून गेले. 

त्यांनी दुचाकी रवीनगरातच उभी केली होती. येथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तसे बघायला मिळते. परंतु ऑटोचा आणि दुचाकीचा क्रमांक कुठल्याही कॅमेऱ्यात स्पष्ट दिसत नाही. रात्रभर पोलिसांनी श्री. लुणीया यांच्या एमआयडीसीमधील कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांची चौकशी केली. शारदानगर ते रवीनगरपर्यंत वीस ते पंचवीस ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. परंतु वीस तासांनंतरही पोलिसांना ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचता आले नाही. दरम्यान, उपायुक्त शशिकांत सातव यांनी शारदानगर येथील श्री. लुणीया यांच्या निवासस्थानी भेट दिली. कुटुंबातील सदस्यांची त्यांनी तब्बल दोन तास चौकशी केली.

अपहरण कशासाठी?

लुणीया कुटुंबाची माहिती ठेवणाऱ्याने चिमुकल्याचे अपहरण केल्याची शक्‍यता वर्तविण्यात आली. परंतु दुसऱ्या दिवशीही खंडणीसाठी कुणाचाही कुटुंबातील सदस्यांना फोन आला नाही. त्यामुळे अपहरण कशासाठी? हा प्रश्‍न अनुत्तरित आहे.

चिमुकल्याच्या अपहरणाचे कारण अद्याप पुढे आले नाही. परंतु घटना घडली तेव्हाची स्थिती बघता ओळखीतील व्यक्ती यात सहभागी असण्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली. विविध टप्प्यांत चौकशी सुरू आहे. चिमुकल्या नयन लुणीयाच्या शोधासाठी पोलिस पथक विविध ठिकाणी रवाना झालेले आहेत.
-डॉ. आरती सिंह, 
पोलिस आयुक्त, अमरावती.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT