tiger 
विदर्भ

आठ लोकांचा जीव घेणाऱ्या वाघाला गोळ्या झाडा; खासदार धानोरकरांची वनमंत्र्यांकडे मागणी 

साईनाथ सोनटक्के

चंद्रपूर ः राजुरा, विरुर वनपरिक्षेत्रात नरभक्षक वाघाने गेल्या २२ महिन्यांपासून धुमाकूळ घातला आहे. आजवर आठ शेतकऱ्यांना या वाघाने ठार केले, तर अनेकांना गंभीर जखमी केले. शेतकऱ्यांची जनावरेही वाघाने फस्त केली. वनविभागाने पथके स्थापून वाघाचा शोध घेत आहे. मात्र, अजूनही वाघ तावडीत सापडला नाही. आता या नरभक्षी वाघावर गोळ्या झाडून ठार मारावे, अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी वनमंत्र्यांकडे केली आहे. 

राजुरा व विरुर वनपरिक्षेत्रात मागील २२ महिन्यांपासून नरभक्षक वाघाचा धुमाकूळ सुरू आहे. त्याने आठ निष्पाप शेतकऱ्यांचा बळी घेतला, तर तीन शेतकऱ्यांना जखमी केले. त्यानंतर वनविभागाने या वाघाला पकडण्यासाठी मोहीम हाती घेतली. दीडशेच्या आसपास कॅमेरे या वनपरिक्षेत्रात लावले. वनकर्मचाऱ्यांचे पथक दिवसरात्र वाघाचा शोध घेत आहेत. मात्र, अजूनही वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले नाही. जवळपास २१ गावे या वनपरिक्षेत्रात येतात. या भागातील मुख्य व्यवसाय शेती आहे.

सध्या खरीपाचा हंगाम सुरू आहे. या क्षेत्रात कापूस, धान, सोयाबीन पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. वाघाच्या दहशतीत शेतकरी घाबरलेले आहेत. जीव मुठीत घेऊन शेतकरी कामे करीत आहेत. वाघाला जेरबंद करण्यासाठी काही दिवसांपासून वनविभागाने पथके तयार केली. मात्र, वनविभागाच्या तावडीत वाघ काही सापडला नाही. मागील दोन ते तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या मोहिमेत वनविभागाला सपशेल अपयश आले आहे. 

शनिवारी (ता. १०) काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी मुख्य वनसंरक्षक प्रवीण कुमार यांच्याशी बैठक घेतली. त्यानंतर वनमंत्री राठोड यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा केली. या चर्चेत त्यांनी राजुरा वनपरिक्षेत्रातील नरभक्षक वाघाने आजवर घेतलेल्या बळीची माहिती दिली. या वाघाला गोळ्या झाडा, अशी मागणी त्यांनी चर्चेत केली. यावेळी ज्येष्ठ नेते विनोद दत्तात्रय, अल्पसंख्याक कमिटीचे जिल्हाध्यक्ष सोहेल रजा, ओबीसी कमिटीचे जिल्हाध्यक्ष उमाकांत धांडे यांची उपस्थिती होती. 

आजी, माजी आमदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र 

राजुरा, विरूर वनपरिक्षेत्रात नरभक्षक वाघाने धुमाकूळ घातला आहे. आजवर आठ शेतकऱ्यांना वाघाने ठार केले. या वाघाला ठार मारावे, वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी आमदार सुभाष धोटे, माजी आमदार निमकर, माजी आमदार संजय धोटे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केली आहे. 

मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना नोकरी द्या 

वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबांतील वारसदारांना व्याघ्रग्रस्त म्हणून वनविभागात नोकरी देण्यात यावी. शासकीय मदत १५ लाखांवरून २५ लाख करण्यात यावी. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात यावे. जंगलालगत शेतीला तारेचे कुंपण करण्यात यावे. वन्यजीवमार्फत झालेल्या नुकसानभरपाईचे पंचनामे करून पंधरा दिवसांच्या आत शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी माजी आमदार निमकर यांनी केली आहे. 

संपादन ः राजेंद्र मारोटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Interest Update : होळीला कोट्यवधी भारतीयांना मिळणार खुशखबर ! PF वर मिळणार तब्बल 'इतके' व्याज, CBT बैठकीत मोठा निर्णय ?

Mumbai News: महिलांच्या हातामध्ये आता ‘पॅनिक बटण’, यात्री अ‍ॅपमध्ये ‘एसओएस’ फीचर; वापर कसा करायचा?

T20 WC, IND vs WI : जसप्रीत बुमराहने ३ चेंडूंत फिरवलेली मॅच, पण वेस्ट इंडिजच्या फलंदाजांची खणखणीत फटकेबाजी; भारतासमोर तगडे लक्ष्य

8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट ! महागाईच्या पार्श्वभूमीवर ५०% DA मर्जर होणार ?

T20 WC, IND vs WI : शिमरोन हेटमायरच्या विकेटवरून 'राडा'! विडींजच्या खेळाडूंची तीव्र नाराजी, वातावरण तापले; जसप्रीतने दिले २ धक्के

SCROLL FOR NEXT