file 
विदर्भ

अरेरे, जुन्या भांडणातून हाणली डोक्‍यात कुऱ्हाड

सकाळ वृत्तसेवा

टाकळघाट (जि.नागपूर) ः अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या जुन्या वादातून चिडलेल्या दोघा सख्ख्या भावांनी घराशेजारील युवकाच्या डोक्‍यावर सब्बल व कुऱ्हाडीने वार खून केला. यात एक जखमी झाला. ही घटना एमआयडीसी पोलिसांच्या हद्दीतील सालाईदाभा येथील असून गुरुवारच्या रात्री नऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी (ता. 20) सकाळी आरोपींना अटक केली.

आरोपी दोघे सख्खे भाऊ अटकेत
मृताचे नाव बिबीसन श्रीराम कामडी (वय 42) तर जखमीचे नाव किशोर श्रीराम कामडी (वय 45) दोघेही सख्खे भाऊ सालाईदाभाचे रहिवासी आहेत. आरोपीचे नाव प्रकाश गुलाब मसराम (वय 37) आणि रंजित गुलाब मसराम (वय 34) हे दोघेही सख्खे भाऊ असून ते सालाईदाभाचे रहिवासी आहेत. सध्या ते हिंगणा येथे राहत होते. बिबीसन कामडी व आरोपी बंधू मसराम यांचे घर सालईदाभा येथे एकमेकांच्या घरासमोर असल्याने नेहमी यांच्या कुठल्या ना कुठल्या तरी कारणावरून वाद व्हायचा. बऱ्याच दिवसांपासून त्यांचे एकमेकांशी भांडण होत असल्याने सहा दिवसांपूर्वी एमआयडीसी पोलिसात तक्रार दाखल झाली होती. त्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली होती. बिबीसन कामडी याने आरोपी मसरामच्या सेंट्रिगच्या पाट्या जाळल्या म्हणून यांच्यात वाद झाला. त्यामुळे वाद इतका विकोपास गेला की किशोर यास मारहाण करणे सुरू झाल्याने तो जखमी होताच त्याची पत्नी शोभा मधे पडली. बिबीसनसुद्धा भांडणात सहभागी होताच त्याला मसराम या दोघा सख्ख्या भावांनी लोखंडी सबलीचा वार करून खाली पाडले व त्याच्या डोक्‍यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले. या हल्ल्यात बिबीसन गंभीर स्वरूपात जखमी झाला. जमलेल्या लोकांनी त्याला बुटीबोरी येथील खासगी रुग्णालयात नेताच डॉक्‍टरांनी त्यास नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात "रेफर' केले. परंतु रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.
जखमी किशोर कामडी यांच्या पत्नी शोभा यांच्या तक्रारीवरून पोलिस निरीक्षक विनोद ठाकरे व भास्कर मेटकर यांच्या पथकाने घटनास्थळाचा पंचनामा केला. आरोपीच्या शोधार्थ डीबी पथक रवाना करून हिंगणा परिसरातून आरोपीस शुक्रवारी सकाळी अटक करण्यात आली.

आरोपी, फिर्यादी दोघे सख्खे भाऊ
आरोपी मसराम यांचे कुटुंब सालईदाभाचे रहिवासी असून कामडी यांच्यासोबत होत असलेल्या नेहमीच्या भांडणामुळे त्रस्त असल्याने हिंगणा येथील धनगरपुरा येथे ते वास्तवास गेले होते. सालईदाभा येथे शेती असल्याने त्याच्या राहत्या घरी फक्त कापूस ठेवला जात होता. त्यांच्यात अंदाजे दहा ते बारा वर्षांपासून छोट्या-मोठ्या कारणावरून वाद व्हायचा. शेवटी वाद इतका विकोपास गेला की त्याचे पर्यवसान हत्येत झाले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Orange Alert : विदर्भाला ‘ऑरेंज अलर्ट’; राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता पुणे घाटमाथ्याला ‘यलो अलर्ट’

IND vs NZ T20I Squad: भारत-न्यूझीलंड ट्वेंटी-२० मालिकेसाठी संघ जाहीर; अष्टपैलू खेळाडूची माघार, १५ जणांची तगडी टीम

PITRU PAKSHA 2026 VASTU TIPS: घरात सुख-शांती आणि सकारात्मकता राहिल टिकून! पितृपक्षापूर्वी फक्त 'या' ४ वस्तू बाहेर काढा

Marathi News Live Updates : माथेरान टॉय ट्रेनच्या मार्गावर दरड कोसळली

Ajit Pawar Jay Pawar : अजित पवारांचा 'अजित सृष्टी' देखावा पाहून जय पवारांना रडू आवरलं नाही; ‘आई अजून रडत असते का'?

SCROLL FOR NEXT