Kuli 
विदर्भ

कोरोना आला आणि तोंडचा घास हिरावला; आता लेकराबाळांचे पोट भरण्याची पडली त्यांना चिंता

सुधीर भारती

अमरावती  : "सारी दुनिया का बोझ हम उठातें हैं', अमिताभ बच्चन यांची प्रमख भूमिका असलेल्या "कुली' या हिंदी चित्रपटातील या गाण्याने रेल्वेस्टेशनवर कुलीचे काम करणाऱ्यांचे संघर्षमय आयुष्य जगासमोर मांडले. मात्र, कोरोना व लॉकडाउननंतर रेल्वेप्रवाशांच्या भरोशावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणाऱ्या कुली बांधवांची मजुरी हातची गेली आणि त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. 

बडनेरा रेल्वेस्टेशन भारतीय रेल्वेचे एक महत्त्वाचे स्टेशन आहे. दररोज हजारो प्रवासी या स्टेशनवर उतरतात व वेगवेगळ्या गाड्यांमध्ये चढतात. प्रवाशांच्या भरवशावरच कुलींच्या घराची चूल पेटते. परंतु शेकडो प्रवाशांचा बोझा उचलणारे कुली त्यांच्या कुटुंबाचा बोझा उचलण्यास सध्या असमर्थ ठरत आहेत. तीन महिन्यांपासून कोरोना तसेच सततच्या लॉकडाउनमुळे या कुली बांधवांचे आयुष्यसुद्धा थांबलेझाले. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सारे काही सुरळीत असताना दररोज प्रत्येकी 400 ते 600 रुपये मजुरी वाट्याला येत होती. त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह कसाबसा करीत होते, मात्र आता तेसुद्धा बंद झाले आहे. अशा स्थितीत आता करायचे तरी काय? असा प्रश्‍न कुली बांधवांसमोर निर्माण झाला आहे. 

अनेकांसमोर तर आता पुढे काय करावे? असा मोठा प्रश्‍न उभा ठाकला आहे. बडनेरा स्टेशन अंतर्गत मो. सलीम मो. शरीफ., सैय्यद अफसर सै. अख्तर, शेख समीर शेख बुडन, विनोद वानखडे, प्रमोद उके, धर्मेंद्र नारनवरे, अहमदखान रहीम खान, शेख शहबाज शे. शरफुद्दीन, सै. इद्रिस सै. अबरार, प्रवीण वासनिक, एजाज खॉं बसन खॉं, हिरामण पाटील, सै. इकबाल सै. अख्तर, शे. नसीम शे, उस्मान आदी कुलीबांधवांवर सध्या अतिशय कठीण वेळ आली आहे. 

कुलींसमोर रोजगाराचा प्रश्‍न 

उन्हाळा गेला, प्रमुख सण गेले आणि आता दिवाळीचेसुद्धा काही खरे नाही. या प्रमुख प्रसंगी रेल्वेस्टेशनवर प्रवाशांची तोबा गर्दी असते. त्यातून रोजगार मिळतो, मात्र आता काहीच हाती राहिलेले नाही. आता मजुरीच्या कामाला जावे काय? असा प्रश्‍न कुली बांधव विचारत आहेत. 

लॉकडाउनमुळे आमचा रोजगार हिरावला. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अनेकांनी आश्‍वासने दिली, स्वप्ने दाखविली, खांद्यावर हात ठेवत कोरडा धीर दिला, मात्र पोट कुणामुळेच भरले नाही. काही दानशूर व्यक्तींकडून थोडी मदत होते, मात्र तीसुद्धा अपुरी आहे. समाजाकडून आमच्या कुठल्याच आशा राहिलेल्या नाहीत. 
- प्रमोद उके 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहने करेक्ट कार्यक्रम केला! बेन स्टोक्स, जो रूटचा चतुराईने उडवला त्रिफळा; वोक्सही OUT

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठीचा आदर राखत अभिनेत्याने जिंकली कानडी मने

Stock Market Closing: शेअर बाजार लाल रंगात; सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद, कोणते शेअर्स वाढले?

SCROLL FOR NEXT