Leopard attack on Boy in Yavatmal disrict
Leopard attack on Boy in Yavatmal disrict  
विदर्भ

रात्री झोपेत असताना अचानक बिबट्यानं केला मुलावर हल्ला; एका इंजेक्शनसाठी पालकांची मध्यरात्री वणवण

अरविंद ओझलवार

उमरखेड (जि. यवतमाळ) : पैनगंगा अभयारण्यामध्ये वसलेल्या जेवली गावातील मथुरा नगर येथे दिनांक 3 फेब्रुवारी रोजी रात्री अडीच ते तीनच्या दरम्यान बिबटयाने घराच्या ओसरीमध्ये विशाल विजय ब्राह्मण वय वर्ष 10 हा झोपला असता याच्यावर हल्ला करून जखमी केले. बिबट्यानं अचानक झोपेत असताना हल्ला केला. त्यांच्या शेजारी झोपलेल्या आई आणि लहान भाऊ यांनी आरडाओरडा केल्यामुळे तसेच लगेच शेजारी धावुन आले.  त्याचवेळी गावांतील नागरीक शेतातुन पाणी देऊन मोटर सायकलने गावात येत होते. त्यांनी बिबट्याला पळून लावत विशालचा जीव वाचवला.

बिबट्याने लहान मुलांवर जिवघेण्या हल्ल्याची वार्ता वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या कानावर टाकली लागलीच वन विभागाचे कर्मचारी वन परिक्षेत्र अधिकारी ओमप्रकाश पेंदोर यांनी वनपाल शिंदे , वनरक्षक चव्हण  यांनी व नागरीकांनी  विशाल ला त्वरीत जेवली येथील उपकेंद्र येथे आणले तेथील डॉक्टरने त्याला पुढील उपचारासाठी सोंनदाभी येथील आरोग्य केंद्रात दाखल केले  

तिथेही प्रथम उपचार करुन ढाणकी प्राथमिक आरोग्य केंद्रात येथील डॉ सदाशिव धनवे यांनी तात्पुरते उपचार केले .मानवाला कोणत्याही प्राण्याने चावा घेतल्याने देण्यात येणारे रेबीज इंजेक्शन सरकारी दवाखान्यात नसल्याने ढाणकी येथील मेडिकल स्टोअरमध्ये शोध घेण्यात आला परंतु कोणत्याही मेडिकल मध्ये सदर इंजेक्शन उपलब्ध नव्हते त्यामुळे विशालला पुढील उपचारासाठी यवतमाळ जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले.

आज दिनांक 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता जेवली येथेच बिबट्याने गायीच्या वासराला हल्ला करून  जखमी केले त्यामुळे दोन्ही हल्ले एकाच दिवशी झाल्याने जेवली येथील नागरीकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अभयारण्या तील हींस्त्र प्राण्यांपासून नागरीकांच्या जीव धोक्यात येत आहे त्याकरीता गावाशेजारी तार कुंपण घालण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

वारंवार या घटना घडत असताना या हिंस्त्र प्राण्यांपासून परिसरातील नागरिकांना वाढता धोका लक्षात घेता प्रतिबंधक उपाययोजना करणे आवश्यक आहे .या परिसरात दोन प्राथमिक दवाखाने येतात वनात अनेक पशु पक्षी वावर करतात ते प्राणी मानवा वर जीवघेणा हल्ला  करतात त्याकरिता सर्वप्रथम उपचारा करीता जवळील दवाखाना गाठल्या जातो परंतु त्या ठिकाणी जंगली प्राण्याने मनुष्याला चावा घेतल्यानंतर दिल्या जाणारे इंजेक्शन उपलब्ध राहत नाही त्यामुळे सदर इंजेक्शन मार्केट मधून आणण्यास सांगितले जाते प्रशासनाने लक्ष देऊन सदर इंजेक्शन मुबलक प्रमाणात दोन्ही सरकारी दवाखान्यात करून देण्यात यावे व माणसाला व पोटच्या लेकरा प्रमाणे जपलेल्या जनावरांचा जीव धोक्यात येण्यापासून वाचवावे अशी मागणी अभयारण्यातील नागरिक करीत आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : Lok Sabha Election 2024 : जाणून घ्या 6 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : कंगना रणौत यांच्या रॅलीवर दगडफेक; काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT