Licenses of three barriers in Amravati district canceled Farmers news 
विदर्भ

ॲडव्हांसच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून घेतली अडत; तिघांचे परवाने रद्द

क्रिष्णा लोखंडे

अमरावती : शेतकऱ्यांकडून ॲडव्हांसच्या नावाखाली अडत वसूल करणाऱ्या तीन अडत्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. त्यांनी शेतकऱ्यांकडून वसूल केलेली आठ टक्के अडत परत करण्यासही बजावण्यात आले असून, पुरावा सादर करण्यास सांगण्यात आले आहे. पाच वर्षांपासून सुरू असलेल्या बेकादा अडत वसुलीच्या गोरखधंद्याविरोधात शेतकऱ्याने तक्रार केल्यानंतर कारवाई करण्यात आली.

पंकज जळीतकर, विनोद मांडळे व सुधाकर बनारसे असे अडत परवाने रद्द करण्यात आलेल्या अडत्यांची नावे आहेत. त्यांच्या विरोधातील तक्रारीत तथ्य आढळून आले आहे. त्यांनी शेतकऱ्यांकडून आठ टक्के अडत ॲडव्हांसच्या नावाखाली वसूल केल्याचे पुरावे कागदोपत्री आढळल्याने त्यांची अनुज्ञप्ती रद्द करण्यात येत असल्याचा आदेश बाजार समिती प्रशासनाने बजावले आहेत.

५ जुलै २०१६ ला शेतकऱ्यांकडून अडत घेण्यावर बंदी लावण्यात आली आहे. मात्र, येथील बाजार समितीच्या भाजीपाला यार्डात शेतकऱ्यांकडून अडत्यामार्फत ॲडव्हांस या गोंडस नावाखाली आठ टक्के अडत घेतली जात होती. मिरची उत्पादक शेतकरी नितीन मोहोड यांनी या प्रकाराबद्दल थेट पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यामुळे बाजार समिती प्रशासन हादरले व त्यांनी चौकशी सुरू केली.

१६ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. या समितीने अडत्यांकडे तपासणी करून संचालक मंडळास अहवाल सादर केला. अहवालातील तथ्य व निष्कर्ष बघून संचालक मंडळाने तिन्ही अडत्यांचे परवाने रद्द करण्याचे व त्यांनी वसूल केलेली अडत शेतकऱ्यांना परत करण्याचे आदेश दिलेत.

बाजार निरीक्षकांचे स्थानांतर

भाजीपाला बाजारातील निरीक्षक तथा इन्चार्ज मकवाने यांचे स्थानांतर धान्य बाजारात करण्यात आले आहे. त्यांच्यावर दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यांच्या विरोधात स्थानांतराची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Address: विराट-अनुष्का यांचा लंडनमधील पत्ता सापडला? माजी इंग्लिश खेळाडूने दिली हिंट

Jack Dorsey's New App : खुशखबर! आता इंटरनेट नसलं तरी करता येणार चॅटिंग; जॅक डोर्सीच 'हे' अ‍ॅप घेणार व्हॉट्सअ‍ॅपची जागा, तुम्ही पाहिलंत का?

पास की नापास? प्रेक्षकांना कसा वाटला 'हळद रुसली कुंकू हसलं' चा पहिला भाग? म्हणाले- पाव्हणं...

Latest Maharashtra News Updates : 30 महिला अधिकाऱ्याचे लैंगिक शोषण करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई

Mumbai News: एमएसआरटीसीच्या दररोजच्या फेऱ्यात घट, कर्मचाऱ्यांना त्रास; दररोज लेटमार्कने हैराण

SCROLL FOR NEXT