liquor Party in the separation room in Chandrapur district 
विदर्भ

पडदे लावून तरुणांनी मध्यरात्री सुरू केला धिंगाणा, मग...

राहुल मैद

ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) : जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या वाढणाऱ्या संख्येमुळे प्रशासन आणि सामान्य नागरिक चिंतेत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासन दिवसरात्र एक करीत असताना संस्थात्मक विलगीकरण केलेल्या तरुणांचा बेफिकरपणा पुढे आला आहे. या तरुणांनी विलगीकरण कक्षातच चिकन पार्टी केली. चिकन सोबत दारूची व्यवस्था होती. झिंग चढल्यानंतर या युवकांनी विलगीकरण असलेल्या शाळेतील सामानांची नासधूस केली. हा ओल्या पार्टीचा धक्कादायक प्रकार ब्रह्मपुरी तालुक्‍यातील बरडकिन्ही येथे घडला. 

दुसऱ्या राज्यात, जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांना स्वगावी पोहोचविण्यासाठी सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. बाहेरून आलेल्या नागरिकांचे गावात पोहोचल्यानंतर संस्थात्मक विलगीकरण करणे बंधनकारक आहे. ग्रामीण भागात अशा लोकांना ठेवण्यासाठी जिल्हा परिषद शाळेचा उपयोग केला जात आहे. ज्ञानदानाचे काम करणारी शाळा कोरोनाच्या संकटात विलगीकरणासाठी वापरली जात आहे. मात्र, याच इमारतीत चक्क चिकन आणि सोबत दारूची पाटी झाल्याची घटना उजेडात आली.

तालुक्‍यातील बरडकिन्ही येथील अनेक युवक कामानिमित्त पुणे व मुंबई येथे राहत होते. आता टाळेबंदीमुळे त्यांचा रोजगार हिरावला. त्यामुळे त्यांना घराची वाट धरावी लागली. ते तीन दिवसांपूर्वी बरडकिन्ही येथे पोहोचले. त्यानंतर त्यांचे गावातील जिल्हा परिषद शाळेत विलगीकरण करण्यात आले. त्याच सायंकाळी या युवकांनी पार्टीचा बेत आखला. गावातील एका व्यक्तीने त्यांच्यासाठी चिकनची व्यवस्था केली. सोबतच दारूचेही जुगाड करून दिले. 

जवळपास चाळीस जण या शाळेत विलगीकरणात आहे. मात्र, यातील काही जणांनी पार्टीचा बेत आखला होता. अंधार पडल्यानंतर शाळेत पार्टी सुरू झाली. काही वेळानंतर दारूने आपला रंग दाखविला आणि झिंग चढलेल्या या युवकांनी शाळेतील सामानांची प्रचंड नासधूस केली. विलगीकरणात असलेल्या व्यक्तींचा गावकऱ्यांशी संपर्क येऊ नये, यासाठी शाळेला पडदे लावले आहे.

पडद्याआड सुरू असलेल्या हा प्रकार तोडफोडीच्या आवाजाने गावकऱ्यांना समजला. परंतु, ते कोरोनाच्या भीतीने तिथे जाऊ शकले नाही. शेवटी प्रशासनाला याची माहिती दिली. दुसऱ्या दिवशी तहसीलदार आणि पोलिस तिथे पोहोचले. त्यांना युवकांना चांगलीच समज दिली. 

दारू आली कुठून?

जिल्ह्यात मागील पाच वर्षांपासून दारूबंदी आहे. त्यानंतरही मोठ्या प्रमाणात दारू येथे पोहोचत होती. टाळेबंदीत आंतरजिल्हा, आंतरराज्य वाहतूक बंद आहे. तेव्हापासून दारूची तस्करी थंडावली होती. जिल्ह्याच्या सीमा सील केल्या आहे. चोवीस तास पोलिसांचा पहारा आहे. त्याउपरही ब्रह्मपुरी तालुक्‍यातील बरडकिन्ही सारख्या आडवळणाच्या गावात दारू आली कुठून? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. याचे उत्तर मात्र प्रशासन देऊ शकले नाही.

गावात असे प्रकार घडणार नाही 
जिल्हा परिषदेच्या शाळेत विलगीकरण केलेल्या युवकांनी चिकन पार्टी केली आहे. यानंतर गावात असे प्रकार घडणार नाही. यासाठी आम्ही प्रयत्न करू. 
- लताताई बगमारे, 
सरपंच, बरडकिन्ही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT