lobbying for education deputy director post in amravati
lobbying for education deputy director post in amravati  
विदर्भ

शिक्षण उपसंचालकांच्या खुर्चीसाठी 'लॉबिंग', इच्छुकांनी घेतली शिक्षणमंत्र्यांची भेट

सुधीर भारती

अमरावती :  शिक्षण विभागातील अतिमहत्वाचे समजले जाणारे शिक्षण उपसंचालक या पदासाठी सध्या जोरदार रस्सीखेच सुरू आहे. विशेष म्हणजे इच्छुकांकडून राजकीय स्तरावरून या खुर्चीसाठी जोरदार 'लॉबिंग' करण्यात येत आहे. रविवारी (ता.29) अमरावती येथे एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची काही इच्छुकांनी भेट घेतली आहे. त्यामुळे हालचालींना वेग आला आहे. 

विभागीय मुख्यालय असलेल्या अमरावती जिल्ह्याचा विभागातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेने अव्वल क्रमांक लागतो. त्यातही शिक्षण उपसंचालकांची खुर्ची म्हणजे शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च अधिकाराची व बहुमानाची समजली जाते. यापूर्वी सुद्धा उपसंचालकपदासाठी राजकीय लॉबिंग करण्यात आले आहे. सध्या शिक्षक मतदारसंघाची रणधुमाळी सुरू असून 3 डिसेंबरला निवडणुकीच्या निकालानंतर या बाबतचा निर्णय होण्याची अपेक्षा आहे. रविवारी एका उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेल्या शिक्षणमंत्र्यांचा कार्यक्रम संपल्यानंतर काही इच्छुकांनी स्वागताच्या बहाण्याने शिक्षणमंत्र्यांची भेट घेतल्याची चर्चा सध्या सुरू आहे. संबंधित अधिकारी या पदासाठी मागील काही दिवसांपासून जोरदार प्रयत्न करीत आहे. मात्र, अद्याप त्यांची डाळ शिजलेली नाही.

3 डिसेंबरला निवडणूक निकालानंतर निर्वाचित होणाऱ्या आमदारांचे मत याबाबत महत्त्वाचे राहणार आहे. त्यामुळे कोणता उमेदवार शिक्षक आमदार बनणार यावर सुद्धा सर्व खेळ अवलंबून राहणार आहे. विभागातील माध्यमिक शाळांची संपूर्ण नाडीच शिक्षण उपसंचालकांच्या हाती असल्याने अनेकजण या पदासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT