lottery business in buldana.jpg
lottery business in buldana.jpg 
विदर्भ

अरे हे काय! नशीब पालटण्याचे स्‍वप्‍न दाखवणारा हा व्यवसायही झाला लाॅक; शौकिनांचाही हिरमोड

श्रीधर ढगे

खामगाव (जि.बुलडाणा) : कोरोनाच्‍या पार्श्वभूमीवर अनेक छोटे मोठे उद्योग, व्‍यवसाय डबघाईस येते असल्‍याचे चित्र सध्या दिसून येत आहे. असाच एक व्‍यवसाय म्‍हणजे लॉटरी विक्रेत्‍यांचा कधी तरी आपले नशीब पालटेल या आशेवर अनेक जण नियमित लॉटरीचे तिकिट विकत घेतात. तर काही केवळ छंद म्‍हणून परंतु गेल्‍या काही दिवसापासून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक व्‍यवसायांवर निर्बंध घालण्यात आले असून त्‍यामुळे अनेकांना नशीब पालटण्याचे स्‍वप्‍न दाखवणाऱ्या लॉटरीचेचं भाग्‍य लॉकडाउन झाले आहे.

जगभरात पुरातन काळापासून जुगार खेळून आपल्या गरज भागवण्याचे प्रथा होत्या. नशिबाचा खेळ, संधीचा खेळ म्हणून प्रसंगी धोका पत्करुन मिळवलेल यश हे अनेकांचे जीवन समृध्द करणारे ठरत, याच तत्वावर अनेक प्रकारचे जुगार खेळले जात असत नंतरच्या काळा प्राण्यांच्या शर्यती लावून त्यावर पैसे लावून जुगार खेळला जात असत. यातून मिळणाऱ्या महसूलावर अनेक विकास कामे होती.या भावनेतून लॉटरीला कायदेशीर स्‍वरुप देण्यात आले. तिला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर भारतात अनेक राज्यांनी या प्रकारे लॉटरी सुरू करीत व्यवसायत उडी घेतली.

राज्‍यात प्रत्‍येक तालुक्‍यात किमान प्रत्‍येक बसस्‍थानक, रेल्‍वे स्‍टेशन, विमानतळाबाहेर, मंदिराबाहेर लॉटरी विक्रीचे स्‍टॉल असतात. लॉकडाउन सुरु झाल्‍यापासून लॉटरी सोडती रद्द झालेल्‍या आहे. छोट्या एंजटचे दररोजची उपजिविका व्‍यवसाय बंद असल्‍याने त्‍यांचे कुटूंबाचा खर्च भागवणे कठीण आहे. या व्‍यवसायाशी निगडित लोकांची संघटना नसल्‍याने त्‍यामुळे आपली व्‍यथा देखील ते कोणाला सांगू शकत नाहीत. त्‍यामुळे अडचणीच्‍या वेळी कोणाकडे मदत मागायची असा, प्रश्‍न या छोट्या व्‍यवसायिकांसमोर आहे. तर दुसरीकडे मात्र नशीब आजमावणाऱ्या काही लॉटरी शौकिनांचा हिरमोड झाला आहे.

ग्राहकांचे चौकशीचे फोन येतात
२२ मार्च पासून कोरोनाच्‍या संक्रमणामुळे झालेल्‍या लॉकडाउननंतर सर्वच ड्रॉ स्‍थगित केले आहे. त्‍यात गुढपाडव्‍याच्‍या ड्रॉ ची तिकिटे मोठ्या प्रमाणावर विकली आहेत. ग्राहकांचे चौकशीचे फोन येत आहेत. त्‍यामुळे सोडती सुरू करण्यात यावा.
- श्‍याम गोरले, गोरले लॉटरी सेंटर, खामगाव

आर्थिक अडचणी
लॉकडाउन सुरू झाल्‍यापासून माझी लॉटरीची दुकान बंद असून आज जवळपास 50 दिवसांच्‍यावर कालावधी झाला आहे. आता आर्थिक अडचणी निर्माण होत असून सरकारने आमच्‍या व्‍यवसायाबाबत देखील विचार करावा.
- मनिष खेतान, खेतान लॉटरी सेंटर, खामगाव

खामगावमध्ये अनेक जण मालामाल
लॉटरी नशीबाने लागते. खामगाव शहरात अनेक जन लॉटरी योजनेत नशीबवान ठरेल आहे, एकाला तीन कोटी तर काहींनी लाखो रुयांची बक्षीसे जिंकली आहे. बुलडाणा जिल्ह्यात सर्वात जास्त लॉटरी तिकिटे खामगाव येथे विकली जातात. मात्र आता कोरोनामुळे लॉटरी व्यवसाय सुद्धा लॉकडाउन आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT