rupee.jpg 
विदर्भ

ऐकावे ते नवलच! प्रेयसीची फ्लॅटसह लाखोंची डिमांड, प्रियकराने गाठले पोलिस ठाणे

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : प्रेमात मुलीची फसवणुक, अशा बातम्या नेहमीच ऐकायला मिळतात, मात्र या प्रकरणात चक्‍क प्रेयसीनेच प्रियकराकडे लाखो रुपयांची मागणी करीत त्याला ब्लॅकमेल केल्याचे कळते, एवढेच नव्हे तर या धमकवण्यात तिच्याबरोबर तिची आई आणि आणखी एक व्यक्‍ती असल्याची तक्रार चक्‍क प्रियकरानेच पोलिस ठाण्यात केली आहे.
प्रेमप्रकरण सुरू असताना प्रेयसीची अचानक डिमांड वाढत गेली. त्याने काही पैसे देऊन सेटलमेंट केले. परंतु त्यानंतरही त्याच्या प्रेयसीने चक्क पंधरा लाख रुपये नगदी आणि एका फ्लॅटची नवीन डिमांड केल्याने प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले.

सविस्तर वाचा - प्रियकराने टाकला दबाव, प्रेयसीला झाले असह्य अन...
शहर कोतवाली ठाण्यात लखन कमलेश श्रीवास्तव ( वय 29, रा. परतवाडा) यांच्या तक्रारीवरून शहर कोतवाली ठाण्यात सोमवारी (ता. 24 ) सायंकाळी मुलगी (वय 23 ), आई व दिनेश चौधरी (वय 50, रा. रहाटगाव) या तिघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झाला. मागील तीन वर्षांपासून लखनचे शहरातील 23 वर्षीय युवतीसोबत प्रेमप्रकरण सुरू होते. परंतु काही दिवसांनंतर प्रेयसीची पैशांची डिमांड दिवसेंदिवस वाढत गेली. त्याची पूर्तता करणे त्याला शक्‍य झाले नाही. त्यामुळे 7 जुलै 2018 रोजी त्यांच्यात एक समझोता झाला. त्यावेळी लखनने प्रेयसीला दीड लाख रुपये दिले. पुन्हा तिने बदलू नये म्हणून समझोता करतेवेळी लखनने तशी नोटरीसुद्धा करून घेतली होती. त्यामुळे त्यांचे प्रेमप्रकरण संपुष्टात आले होते, असे तक्रारीत नमूद आहे.

फसविण्याची धमकी

परंतु 20 फेब्रुवारी 2020 रोजी लखनच्या मित्राकडे त्याची पूर्वप्रेयसी, तिची आई आणि दिनेश चौधरी, असे तिघे जाऊन आले. तिने पुन्हा मित्राकडे लखनने पंधरा लाखांची रोकड आणि एक फ्लॅट घेऊन द्यावा, अशी मागणी केली, अन्यथा फसविण्याची धमकी दिली. आपल्याला ब्लॅकमेल केल्या जात असल्याचे लक्षात येताच लखन श्रीवास्तव याने शहर कोतवाली ठाणे गाठून तक्रार नोंदवली. या प्रकरणी पोलिसांनी मायलेकी व चौधरी, अशा तिघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा सायंकाळी दाखल केला. वृत्त लिहीस्तोवर याप्रकरणी कुणालाही अटक झाली नव्हती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT