low water storage available in dam in amravati 
विदर्भ

अमरावतीकरांनो! यंदाही जाणवणार पाणीटंचाईच्या झळा, धरणात कमी पाणीसाठा

कृष्णा लोखंडे

अमरावती : यंदाचा उन्हाळा तीव्र राहण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर पाणीटंचाई जाणवणार नाही याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. गेल्या हंगामात पर्जन्यमान सरासरीपेक्षा अधिक झाल्याने धरणांतील जलसाठा वाढला होता. जिल्ह्यात तो सध्या 500 दलघमी (49 टक्के) आहे.

अमरावती जिल्ह्यात 1 मोठे, 5 मध्यम व 84 लघू प्रकल्प असून त्यांची प्रकल्पीय जलसंचय क्षमता 1010 दलघमी आहे. गेल्या हंगामातील पावसाने जवळपास धरणांमध्ये जलसाठ्याने शंभर टक्‍क्‍यांची सरासरी पार केली होती. जिल्ह्यात सद्यस्थितीत 49 टक्के जलसाठा शिल्लक आहे. एकूण जलसंचय क्षमतेच्या तुलनेत तो निम्मा आहे. एप्रिल व मे हा कडक उन्हाचा व जून हा उतरत्या उन्हाचा अशा तीन महिन्यांचा कालावधी काढायचा आहे. ग्रामीण भागातील काही गावांत आतापासूनच पाणीटंचाईच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. अनेक ग्रामीण पाणीपुरवठा योजना धरणांतील पाणीसाठ्यावर अवलंबून आहेत. जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या अप्पर वर्धा धरणांत 295 दलघमी (52 टक्के) साठा शिल्लक आहे. या धरणावर अमरावती शहरासह तालुका शहर व ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचा ताण आहे. पाच लघू प्रकल्पांत 109  (50 टक्के) व 84 लघू प्रकल्पांत 96 दलघमी (42 टक्के) जलसाठा सध्या आहे. आगामी तीन महिने या साठ्यावर अवलंबले असून यंदा उन्हाळा कडक असल्याच्या संकेतांनी पाण्याची मागणी वाढणार आहे. ती शक्‍यता लक्षात घेता जलसंपदा विभागाने नियोजन केले आहे.

सध्याचा उपलब्ध जलसाठा -

धरण जलसाठा टक्केवारी (दलघमी)
अप्पर वर्धा 295 52
शहानूर 29 63
चंद्रभागा 26 63
पूर्णा 20 57
सपन 29 76
पंढरी 04 07
लघू (84) 96 ः 42

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT