Mahajyoti will give free online education to obc students  
विदर्भ

ओबीसी विद्यार्थ्यांनो स्पर्धा परीक्षेसाठी मिळणार मोफत प्रशिक्षण; 25 डिसेंबरपर्यंत या संकेतस्थळावर करा नोंदणी

मंगेश वणीकर

हिंगणघाट (जि.वर्धा) : : राज्य शासनाने ओबीसीसाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) या स्वायत्त संस्थेची निर्मिती केली आहे. या संस्थेचे मुख्य कार्यालय नागपूर येथे ऑगस्ट 2020 मध्ये सुरू झाले आहे. सर्वप्रथम ओबीसी, एनटी, एसबीसी विद्यार्थ्यांसाठी फार मोठा व महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाच्या माध्यमातून घेतलेला आहे.

ओबीसी या प्रवर्गातील विद्यार्थी विद्यार्थिनी या बारावीनंतर इंजिनिअर मेडीकल आयआयटी अशा व इतर महत्त्वाच्या शासकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी स्पर्धा परीक्षा जेईई, एमएच-सीईटी- नीट अशा देत असतात. पण त्यासाठी विशेष स्पर्धा परीक्षेचे महागडे कोचिंग क्‍लास लावण्याची आर्थिक कुवत ही ओबीसी, भटके व विमुक्त जाती, बारा बलुतेदार आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये नसते. त्यामुळे हे विद्यार्थी या महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षेत टिकाव धरू शकत नाही.

ही बाब लक्षात घेऊन, महाज्योतीने, 2022 मध्ये होणाऱ्या या स्पर्धा परीक्षेसाठी, ओबीसींच्या 10 हजार विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्याचा व त्यांची या स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करून घेण्याचा कार्यक्रम आखण्यात आलेला आहे. अकरावी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना महाज्योतीच्या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे, असे या महाज्योतीवर शासनाने नियुक्त केलेले संचालक प्रा. दिवाकर गमे यांनी सांगितले आहे.\

आठ लाखांच्या उत्पन्नाची अट

ओबीसी व्हीजेएनटी, एसबीसी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योतीच्या, संकेतस्थळावर जाऊन यासाठी 25 डिसेंबर 2020 पर्यंत नोंदणी करावयाची आहे. यासाठी या वर्षी अकरावी विज्ञान प्रवेश घेतलेले जे विद्यार्थी आहेत. ते शहरी भागातील शाळांमधून दहावीला 70 टक्‍के व ग्रामीण, आदिवासी व नक्षलग्रस्त भागातून दहावी पास करणारे 60 टक्‍क्‍यांवर गुण आवश्‍यक आहे. याकरिता उत्पन्न मर्यादा ही नॉन क्रिमीलेअर प्रमाणे वार्षिक 8 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोल्हापुरी चप्पल जगभरात नेण्यासाठी 'प्राडा'शी महत्त्वपूर्ण करार, महाराष्ट्र-कर्नाटकातील कारागीर बनविणार चप्पल; लिडकॉम-लिडकारचा सहभाग

Kapil Dev : ''प्रत्येकाला पैसा हवाय, पण IPL पेक्षा देशासाठी खेळणं महत्त्वाचं''; भारताच्या पराभवावर काय म्हणाले कपिल देव?

स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेतून कलाकारांचा कमबॅक ! माधवीचा रॉयल लूक चर्चेत तर मुख्य भूमिकेत 'ही' अभिनेत्री

PG Medhe Passes Away : सहकारी साखर उद्योगातील नस असलेले पी. जी. मेढे यांचे निधन, राजू शेट्टींना व्यक्त केला शोक

IND vs UAE U19 : ६,६,६,६,४,४,४,४! वैभव सूर्यवंशी गरजला... युएईच्या गोलंदाजांना धु धु धूतला, झळकावली फिफ्टी

SCROLL FOR NEXT