Congress Victory on Teosa Nagarpanchayat e sakal
विदर्भ

तिवसा नगरपंचायतीवर यशोमती ठाकुरांचं वर्चस्व, भाजपसह राष्ट्रवादीला भोपळा

सकाळ डिजिटल टीम

अमरावती : तिवसा नगरपंचायतच्या निवडणुकीत (Teosa Nagarpanchayat Election Result) पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांची परत एकदा एकहाती सत्ता आली असून गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा त्यांच्या पक्षाच्या तीन जागा वाढल्याने अन्य पक्षांचा सुपडासाफ झाला आहे. विशेष म्हणजे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच अपक्षांना या निवडणुकीत खातेसुद्धा उघडता आले नाही. काँग्रेसने तब्बल १२ जागांवर विजय मिळविला असून शिवसेनेचे चार तर वंचित बहुजन आघाडीचा एक उमेदवार निवडून आला. वंचितने तिवसा नगरपंचायतीत पहिल्यांदाच आपले खाते उघडले आहे.

गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे नऊ उमेदवार निवडून आले होते, त्यात यावेळी तीनने वाढ झाल्याने काँग्रेसची बाजू अधिकच भक्कम झाली आहे. सेनेचे गेल्या वेळीसुद्धा चार उमेदवार निवडून आले होते. त्यांनी आपल्या जागा कायम राखल्या आहेत. भाजपला या नगरपंचायतीत मागच्या निवडणुकीत सुद्धा भोपळा फोडता आला नाही व यावेळीसुद्धा त्यांची तीच अवस्था आहे.

तिवसा नगरपंचायतीमध्ये एकूण १७ जागांसाठी मतदान पार पडले. शिवसेना आणि राष्ट्रवादीने मिळून काँग्रेसच्या विरोधात निवडणूक लढवली होती. तिवसा नगरपंचायतीच्या १७ जागांपैकी तब्बल १२ जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. तिवसा नगरपंचायतवर पुन्हा एकहाती काँग्रेसची सत्ता आली आहे. शिवसेनेला चार जागा मिळाल्या आहेत, तर वंचितला एका जागेवर समाधान मानावे लागेल. तसेच राष्ट्रवादी, भाजपला याठिकाणी खातंही उघडता आलं नाही.

तिवसा नगरपंचायतीसाठी ७६.८६ टक्के मतदान -

सार्वत्रिक निवडणुकीत तिवसा नगरपंचायतसाठी 76.86 टक्के मतदान झाले होते. ओबीसी आरक्षणमुळे रखडलेल्या तीन जागांसाठी मंगळवारी मतदान पार पडले. याकरिता 13 उमेदवार रिंगणात होते. तीन जागांसाठी एकूण 1757 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात पुरुष 903 तर 855 महिलांनी मतदान केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उजनी धरणात १२२ टीएमसी पाणी! २० जूनपासून धरणातून सोडले पुन्हा एकदा धरण भरेल इतके पाणी; धरणाच्या पाण्यावर दररोज २ कोटी ३० लाख युनिट वीजनिर्मिती

Ganesh Visarjan 2025: गणरायाला आठव्या दिवशी अर्पण करा बिस्किटासारखे खुसखुशीत तळणीचे मोदक, सर्व मनोकामना होतील पुर्ण

Manoj Jarange-Patil: राजेंचा शब्‍द आमच्‍यासाठी अंतिम: मनोज जरांगे-पाटील; सातारा गॅझेटियरची जबाबदारी शिवेंद्रसिंहराजेंकडे

Devendra Fadnavis on cabinet subcommittee : मराठा आंदोलनावर यशस्वी तोडगा! मंत्रिमंडळ उपसमितीचं फडणवीसांकडून विशेष कौतुक, म्हणाले...

KCR News : केसीआर यांनी स्वत:च्या मुलीची पक्षातून केली हाकालपट्टी; BRS मधील अंतर्गत वादाला नवे वळण

SCROLL FOR NEXT