Maharashtra Weekend Lockdown same lockdown condition one year before  
विदर्भ

Weekend Lockdown: राज्यात दोन दिवस कडक लॉकडाउन; वर्षभरापूर्वीच्या भीषण स्थितीचा येणार अनुभव

मिलिंद उमरे

गडचिरोली : वर्षभरापूर्वी साधारणत: मार्च 2020 मध्ये आलेला अनुभव नागरिकांना शनिवार (ता. 10 ) व रविवार (ता. 11) रोजी पुन्हा येणार आहे. पुन्हा जीवनावश्‍यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद दिसतील, रस्ते ओस पडतील, परिसरात सर्वत्र शुकशुकाट असेल. पुढील काही दिवस दर शनिवार, रविवारी हेच चित्र दिसणार आहे. कारणकोरोनाच्या संकटाने पुन्हा उचल खाल्ल्यामुळे सरकारने शनिवार, रविवारी कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने अंशत: लॉकडाउन प्रारंभ केले आहे. त्यानुसार इतर दिवशी अंशत: लॉकडाउन असले, तरी शनिवार, रविवारी पूर्णत: लॉकडाउन असणार आहे. त्यासंदर्भात प्रशासनाकडून जनजागृतीही करण्यात येत आहे. गडचिरोली शहरात खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने काही उपाययोजना आखल्या आहेत. नागरिक विनामास्क फिरत आहेत तसेच समाजात वावरताना सामाजिक अंतराचे भान ठेवत नाहीत म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी 5 एप्रिल 2021 रोजी जिल्ह्यात कोरोना नियंत्रणासंदर्भात काही कडक़ निर्बंध व टाळेबंदी जाहीर केलेली आहे. सर्व जनतेने त्याचे पालन करणे बंधनकारक आहे. 

कोरोनाविषयक जनजागृती व कोरोनाच्या नियमांचे पालन नागरिकांकडून होण्याकरिता महसूल विभाग, पोलिस यंत्रणा, आरोग्य विभाग व नगरपालिका प्रशासनाच्या वतीने गुरुवार (ता. 8) तहसील कार्यालय गडचिरोली ते मार्केट ते इंदिरा गांधी चौकापर्यंत जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यात पुढील आदेशापर्यंत सोमवार ते शुक्रवार अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व आस्थापने बंद राहतील तसेच शनिवार व रविवारला कडक लॉकडाउन असेल, याची माहिती देण्यात आली. सोबतच नागरिकांनी पाळायचे शारीरिक अंतर, मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे याबाबत सूचना देण्यात आल्या व जनजागृती करण्यात आली. सोबतच नियमाचे उल्लंघन करून दुकाने सुरू ठेवणाऱ्या 3 दुकानदारांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. 

दिवसेंदिवस कोरोना संसर्ग वाढताना दिसून येत आहे. गडचिरोली जिल्ह्यातही रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोज घेतल्यानंतरही कोरोना संसर्ग झाल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. त्यामुळे कोरोनापासून बचावासाठी नागरिकांनीच अधिक काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करावे व लॉकडाउनला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

यंदा विरोधाचे वातावरण

मागील वर्षी कोरोनाचा उपद्रव सर्वांसाठीच नवखा होता. केंद्र सरकारने तडकाफडकी लॉकडाउनचा निर्णय घेतला. जनतेनेही साथ दिली. पण, या वर्षभरापासून अनेक किरकोळ व्यापारी, मजूर, भाजीपाला विक्रेते, शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडला आहे. एकीकडे कोरोनाचे भय आणि दुसरीकडे दुकान सुरू न केल्याने, कामावर न गेल्याने उपासमारीची पाळी येईल. त्यामुळे यंदा अनेक ठिकाणी लॉकडाउनला विरोध होत आहे. विशेषत: व्यापारी वर्गामध्ये विरोधाचे वातावरण दिसून येत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : कर्जाच्या पैशातून मोदींचा केक कापणार? वाढदिवस साजरा करणे म्हणजे आर्थिक गुन्हा, संजय राऊतांचे राज्य सरकारवर ताशेरे

Latest Marathi News Updates : कांद्याचे दर घसरले, शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

जरा आवरा अन् Google Gemini ला स्वत:चे पर्सनल फोटो देण्यापूर्वी ही बातमी वाचा... नाहीतर वेळ निघून जाईल, तज्ज्ञांचा इशारा

कलाकार हवा तर असा ! दशावतारचं यश पाहून हिंदी मीडियाने केलं दिलीप प्रभावळकरांचं कौतुक "बॉलीवूडला लाज वाटायला.."

Rahuri Accident: 'दुचाकींच्या अपघातात एक ठार, एक जखमी'; दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर भीषण धडक

SCROLL FOR NEXT