man died by murder in amravati crime news
man died by murder in amravati crime news 
विदर्भ

इतके वर्ष जगला अन् अखेर हत्येनं गेला, अख्खं गाव हळहळलं; अमरावतीतील मन हेलावणारी घटना

संतोष ताकपिरे

अमरावती : दर्यापूर तालुक्‍यातील लांडी गावात जुन्या वैमनस्यातून वृद्धाचा खून झाला. शनिवारी (ता. सहा) सायंकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अण्णा उत्तम इंगळे (वय 67, रा. लांडी), असे मृत व्यक्तीचे नाव असल्याचे खल्लारचे पोलिस निरीक्षक विनायक लंबे यांनी सांगितले. 

इंगळे यांचा उपचारादरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी रात्री मृत्यू झाला. मृत व्यक्तीचा मुलगा आबाराव अण्णाजी इंगळे (वय 35) यांनी खल्लार ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी  मोहन विक्रम इंगळे (वय 58) विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला रात्रीच अटक केली. 

अण्णाजी इंगळे यांनी काही वर्षांपूर्वी गायरान जमिनीवर झाडे लावली होती. ती झाडे लावण्याला मोहन इंगळे यांचा विरोध होता. त्यावरून मागील काही वर्षांपासून या दोघांच्या कुटुंबामध्ये वादविवाद सुरू आहे. शनिवारी (ता. सहा) सायंकाळी दोघेही समोरासमोर उभे ठाकले. त्यांच्यात पुन्हा जुन्याच कारणावरून भांडण झाले. मोहन यांनी रागाच्या भरात काठीने अण्णा यांच्यावर जोरदार प्रहार केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. जखमी अण्णा इंगळे यांना उपचारासाठी नातेवाइकांनी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अटक संशयित आरोपीला खल्लार पोलिसांनी रविवारी (ता. सात) विशेष न्यायालयासमोर हजर केले. 

वृद्धाच्या हत्येमागे जुना वाद एवढेच कारण पोलिसांच्या प्राथमिक तपासातून पुढे आले आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल.
- विनायक लंबे, पोलिस निरीक्षक, खल्लार पोलिस ठाणे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : सीएसकेची संथ सुरूवात; भुवनेश्वरनं दिला पहिला धक्का

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Buss Accident : उत्तर प्रदेशमध्ये भीषण बस अपघात; ट्रकच्या वेगाने बस कापून निघाली, सात जणांचा मृत्यू

T20 WC 2024 India Squad : विकेटकिपर निवडणं UPSC क्रॅक करण्यापेक्षाही झालं अवघड; 'यांनी' निवडसमितीची डोकेदुखी वाढवली

Latest Marathi News Live Update : हनुमानाची भूमी काँग्रेसला माफ करणार नाही- पीएम मोदी

SCROLL FOR NEXT