Man have to take mortal of wife from home to hospital again  
विदर्भ

मृत्यूनंतर पतीने पत्नीचा मृतदेह नेला घरी पण काही वेळातच घेतली रुग्णालयाकडे धाव

संतोष ताकपिरे

अमरावती : प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे गर्भवतीचा उपचारादरम्यान इर्विनमध्ये मृत्यू झाला. पतीने अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घरी नेला. परंतु माहेरच्यांनी आक्षेप घेतल्यामुळे पुन्हा मृतदेह शवविच्छेदनासाठी इर्विनच्या शवागारात आणावा लागला.

वलगाव ठाण्याच्या हद्दीतील वंडली येथील महिला गर्भवती असल्याने तिची प्रकृती बिघडली. कुटुंबीयांनी उपचारासाठी तिला 19 सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. इर्विनमध्ये उपचार सुरू असताना 21 सप्टेंबर रोजी तिची प्रसूती होऊन तिने दुपारीच बाळाला जन्म दिला. 

त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास उपचारादरम्यान महिलेचा (वय 22) इर्विनमध्ये मृत्यू झाला. त्यामुळे पती नंदकिशोर रामदास पुनसे यांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी वंडली या गावी घरी नेला. 

परंतु मुलीचा मृतदेह बघून माहेरच्यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे मंगळवारी (ता. 22) सकाळी अकरा वाजता पुन्हा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आला. शवविच्छेदन झाल्यानंतर महिलेवर अंत्यसंस्कार पार पडले, असे वलगाव पोलिसांनी सांगितले.

त्या दोघांचा प्रेमविवाह झाला होता. या विवाहाला माहेरच्यांचा विरोध होता. पत्नीच्या प्रसूतीनंतर व मृत्यूनंतर पतीने तिच्या माहेरच्यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर आक्षेप आल्याने शवविच्छेदन झाले.
-आसाराम चोरमले, 
पोलिस निरीक्षक, वलगाव ठाणे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Protest : एमपीएससी आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री ! विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती सांगत म्हणाले- अध्यक्षांना सरकारही हटवू शकत नाही, कारण...

Beed Voter List: बीडच्या मतदार यादीत चक्क उद्धव ठाकरेंचे नाव! पदवीधर मतदार संघातील उमेदवार दिलीप घुगे यांनी नोंदवला आक्षेप; प्रारूप मतदार यादीत घोळ

Inspirational Story: दोन्ही हात नसतानाही हार मानली नाही; माउली बनली महापालिकेची लिपिक, औक्षणाचा क्षण ठरला भावनिक

Missing Link Accident: मिसिंग लिंकवर काळरात्र! आधी पिकअप पलटी, नंतर बस-ट्रकची जोरदार धडक, ६ ते ७ जण जखमी

Pune MPSC Protest: पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पोलिसांचा दणका; ५१ विद्यार्थ्यांसह २९ खासगी शिकवणी चालकांना नोटिसा

SCROLL FOR NEXT