man killed to older brother in mool of chandrapur 
विदर्भ

दारूड्या द्यायचा आई अन् भावाला त्रास, लहान भावासोबत वाद झाला अन् सर्वच संपलं

सकाळ वृत्तसेवा

मूल (जि. चंद्रपूर ) : दारूडया भावाशी झालेल्या मारहाणीत लहान भावाकडून मोठया भावाचा घात झाल्याची घटना तालुक्‍यातील केळझर येथे मंगळवारी (ता. 2) सायंकाळी घडली. सुनील राजाराम मानकर (४०), असे मृताचे नाव असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

मूल पोलिस स्टेशन हद्दीतील केळझर येथील सुनील राजाराम मानकर (40) याला दारूचे व्यसन होते. दररोज दारू पिऊन घरी येणे, आई व भावाला शिवीगाळ करून मारहाण करणे, हे त्याचे नित्याचे काम झाले होते. दोन मार्च रोजी संध्याकाळी सहा  वाजताच्या सुमारास नेहमीप्रमाणे सुनील दारू पिऊन घरी आला. कारण नसताना वाद उकरून काढून त्याने आईला शिवीगाळ करणे सुरू केले. दरम्यान, घरी असलेला लहान भाऊ सुभाष राजाम मानकर (38) याने मोठा भाऊ सुनीलला विनाकारण शिवीगाळ करू नको, असे समजावत खोली बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्या कारणावरून सुनील आणि सुभाषमध्ये शाब्दीक वाद झाला. शाब्दीक वाद विकोपाला जाऊन प्रकरण हातापाईवर पोहोचले. सुनीलने  लहान भाऊ सुभाषला जिवंत मारतो असे म्हणत घरात ठेवलेला लोखंडी दांडका हातात घेतला. लोखंडी दांडका घेऊन सुभाषवर वार करण्याचा प्रयत्न केला. सुभाषने सुनीलचा प्रतिकार केला. सुनीलच्या हातामधून दांडका खेचत असताना झालेल्या झटापटीत राग अनावर झालेल्या सुभाषने सुनीलच्या हातातील दांडक्याने सुनीलाच मारहाण केली. परिणामी, दारूडा सुनील जागीच गतप्राण झाला.

या घटनेची माहिती मूल पोलिसांना होताच ठाणेदार राजपूत आणि सहायक पोलीस निरीक्षक मनोज गदादे सहकाऱ्यांसह  केळझर येथे घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर आई गिरीजाबाई मानकर (60) हीच्या तक्रारीवरून घटनेची नोंद घेऊन लहान भाऊ सुभाष याला ताब्यात घेतले. तपासाअंती सुभाष मानकर याला मोठया भावाची हत्या केल्याचे कारणावरून अटक करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live : मुंबई इंडियन्सने १४ वर्षांचा 'शाप' संपवला! IPL मधील सर्वात मोठा विजय मिळवला; रोहित, रिकल्टनची मॅच विनिंग खेळी

कोल्हापूरची अमृता पुजारी महिला महाराष्ट्र केसरी; वेदिकाला अस्मान दाखवत जिंकली चांदीची गदा अन् कार

अपहरणकर्त्यांचा कॉल ‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात, ५० लाख द्या, पोलिसांत गेल्यास मुलाला ठार मारु’; सोलापूर पोलिसांच्या ‘एलसीबी’ची १४ तासांची मेहनत अन्‌...

MI vs KKR Live: रोहित शर्माची IPL इतिहासातील वेगवान फिफ्टी! ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, 'फॅब फोअर'च्या पंक्तित बसला

Land Survey: भूमापन प्रक्रिया होणार वेगवान! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय; जमीन मोजणीसाठी नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT