man murder his son in wadner of wardha 
विदर्भ

निर्दयी बापानेच केली पोटच्या मुलाची हत्या, एक वर्षाच्या नातवाला केलं पोरकं

सकाळ वृत्तसेवा

वडनेर (जि. वर्धा) : आजनसरा येथे एका बापाने आपल्या पोटच्या विवाहित मुलाची हत्या केली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रमोद काचोळे (वय 30) असे मृताचे नाव आहे, तर अरुण काचोळे (वय 56), असे आरोपी बापाचे नाव असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. 

पोलिस सूत्रांनुसार, आजनसरा येथील आरोपी अरुण कचोळे हे दोन विवाहित मुले विनोद व प्रमोद व पत्नी यांच्यासोबत राहत होते. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून अरुणला दारूचे व्यसन जडले. यातून त्याचे मुलांसोबत नेहमीच भांडण होत होते. त्यामुळे प्रमोद गत दोन वर्षांपासून गावातच घर किरायाने घेऊन वेगळे राहत होते. प्रमोद हा शेती मालवाहतूक व पानठेला चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. दोन वर्षांपूर्वीच प्रमोदचा विवाह झाला असून त्याला एक वर्षाचा मुलगा आहे. 

घटनेच्या दिवशी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास प्रमोद हा नेहमीप्रमाणे शेतात गेला असता, अरुण काचोळे दारूच्या नशेत शेतात आला व प्रमोदला शिवीगाळ करू लागला. त्यामुळे प्रमोदने समजविण्याचा प्रयत्न केला असता तो अंगावर धावून गेला. हातातील कुऱ्हाडीने प्रमोदवर वार केले. यात प्रमोद गंभीर जखमी झाला. याची माहिती शेजारी शेतात काम करीत असलेल्या चाफले यांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना प्रमोद गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. 
चाफले यांनी सदर घटनेची माहिती त्याचा मोठा भाऊ विनोद यांना दिली. त्यामुळे विनोदने घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी अवस्थेत प्रमोदला वडनेर येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. यात मोठ्या प्रमाणात रक्‍तस्त्राव झाल्याने पुढील उपचारासाठी सेवाग्राम येथील कस्तुरबा गांधी रुग्णालयात पाठविण्यात आले. तिथे उपचारादरम्यान प्रमोदचा मृत्यू झाला. 

आरोपी बाप अरुण काचोळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कदम यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार शेट्‌टे, पोलिस उपनिरीक्षक राजू सोनपित्तरे, अजय वानखेडे, लक्ष्मण केंद्रे, प्रवीण बोधाने, विनोद राऊत पुढील तपास करीत आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: मतमोजणी सुरू... नगरपरिषदा व नगरपंचायती निवडणुकीत लोकांचा उत्साह, प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी क्लिक करा

जालन्यात काँग्रेस नेत्याच्या पुतण्यानं संपवलं आयुष्य, कारमध्ये गोळी झाडून घेतली

Epstein Files Missing : अमेरिकेत खळबळ! 'जेफ्री एपस्टाईन'शी संबंधित फाईल्स गायब; २४ तासांत ट्रम्पचा फोटोही डिलीट

Winter Depression Diet: हिवाळ्यात सतत उदास वाटतंय? ‘हे’ पदार्थ खाल्ल्यावर मूड अन् आरोग्य दोन्ही राहील हेल्दी

Bachchu Kadu: बच्चू कडू यांनी मिंथुरला भेट देत पीडित रोशनला दिला धीर; किडनी विकली गेली तरी सरकार गप्प का?

SCROLL FOR NEXT