poklane fired by maoist
poklane fired by maoist 
विदर्भ

पोलिस ठाण्यानजीक माओवाद्यांचा बॉम्बस्फोट 

सकाळ वृत्तसेवा

एटापल्ली (जि. गडचिरोली) : तालुक्‍यातील गट्टा पोलिस स्टेशनपासून 500 मीटर अंतरावर असलेल्या वनविभागाच्या कार्यालयाजवळ माओवाद्यांनी पोलिस पथकाला लक्ष्य करून क्‍लेमोर बॉम्बस्फोट घडून आणला. मात्र, पोलिसांनी बाळगलेल्या सतर्कतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. दुसऱ्या एका घटनेत माओवाद्यांनी पिपली बुर्गी गावालगत रस्त्याच्या कामावरील पोकलेन मशीनची जाळपोळ केली. 
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना व निवडणुकीवर माओवाद्यांच्या बहिष्काराच्या पार्श्वभूमीतून आज, बुधवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास गट्टा पोलिसांकडून नक्षलविरोधी शोधमोहीम राबविली जात होती. वनविभागाच्या कार्यालयाजवळून जाणाऱ्या रस्त्यावर माओवाद्यांनी पोलिसांवर हल्ला करण्याच्या उद्देशाने क्‍लेमोर बॉम्बस्फोट घडवून आणला. मात्र, ही बाब वेळीच पोलिसांच्या निदर्शनात आल्याने ते सतर्क झाले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. 
दुसऱ्या घटनेत एटापल्ली तालुक्‍यातील हालेवार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिपली बुर्गी येथील रस्ता निर्माण कामावरील पोकलेन मशीन माओवाद्यांनी जाळली. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत माओवाद्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. पिपली बुर्गी येथे काही दिवसांपासून रस्त्याचे काम केले जात आहे. या रस्त्याचे काम छत्तीसगडमधील सुखलाल नामक कंत्राटदार करीत आहे. कामावरील मशिनरी व साहित्य ठेकेदार छत्तीसगड राज्यात सुरक्षित स्थळी घेऊन जात होते. मंगळवारी (ता.15) सायंकाळी पोकलेन मशीन, ट्रॅक्‍टर व इतर साहित्य घेऊन जात असताना दबा धरून बसलेल्या शस्त्रधारी माओवाद्यांनी पोकलेन मशीन अडविली. यावेळी इतर वाहने व मशिनरी पुढे निघून गेली होती. त्यामुळे एकच मशीन माओवाद्यांच्या तावडीत सापडली. त्यांनी रस्त्याचे काम बंद करण्याचे आदेश मजुरांना दिले आणि पोकलेन मशीनवर डिझेल टाकून आग लावली. यात कंत्राटदाराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : ट्रॅविस हेडने डाव सावरला; अर्धशतक ठोकत संघाला नेलं शतकाच्या जवळ

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT