marks are given for aadarsh shikshak award in maharashtra  
विदर्भ

अखेर आदर्श शिक्षकांचे गुण जुळले; पुरस्कारांची औपचारिकता बाकी

सुरेंद्र चापोरकर

अमरावती:  आदर्श शिक्षक पुरस्काराबाबत शिक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली असून शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून पुरस्कारासाठी प्रस्ताव आलेल्या शिक्षकांना त्यांच्या कार्यानुसार गुणदान करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. 36 प्रस्तावानुरूप शिक्षकांना गुणदान करण्यात आले असून अधिक गुण असणारे शिक्षक आदर्श पुरस्कारासाठी पात्र ठरणार आहेत.

गुणदानाची यादी आक्षेप किंवा हरकतीसाठी शिक्षण विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली असून आक्षेप नसल्यास लवकरच आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी पात्र ठरलेल्यांची घोषणा केली जाईल. त्यामुळे आदर्श शिक्षक पुरस्काराचे काउन्टडाउन सुरू झाल्याचे मानले जात आहे. 

विशेष म्हणजे यावर्षी गुणदान केल्यानंतर त्याची यादी जाहीर करण्यात आल्याने संपूर्ण पारदर्शकता असल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात आहे. प्राथमिक विभागातून 14 तर माध्यमिक विभागातून दोन शिक्षकांना पुरस्कार देण्यात येणार आहे.

 शिक्षकांकडून राबविण्यात आलेले शैक्षणिक व सामाजिक उपक्रम, वर्गाचा निकाल, लेखन, प्रगत विद्यार्थिसंख्या याबाबी गुणदान करताना लक्षात घेण्यात येतात. गुणदानाची प्रक्रिया आटोपली असून आता पुरस्कारप्राप्त शिक्षकांची अंतिम यादी तयार केली जाईल व त्यानंतर मान्यतेसाठी विभागीय आयुक्तांकडे सोपविण्यात येईल.

गुणदानातील अव्वल शिक्षक

वैशाली सरोदे 64 गुण (अंजनगावसुर्जी), बबलू कराडे 55 (अचलपूर), किशोर इंगळे 48 (अमरावती), मंगेश वाघमारे 32 (चांदूरबाजार), मनोज वानखडे 36 (चांदूररेल्वे), वैजनाथ इप्पर 37 (चिखलदरा), सचिन विटाळकर 64 (तिवसा), किशोर बुरघाटे 47 (दर्यापूर), उमेश आडे 83 (धामणगावरेल्वे), योगीता भुमर 84 (धारणी), अहमदखान पटेल 25 (नांदगावखंडेश्‍वर), लखन जाधव 64 (भातकुली), प्रियंका मनीष काळे 52 (मोर्शी), नंदकिशोर पाटील 35 (वरुड).

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

Dhule Crime : दारूच्या नशेत पत्नीवर प्राणघातक हल्ला, धुळे कोर्टाने सुनावली ५ वर्षांची शिक्षा

SCROLL FOR NEXT