Mazi kanya Bhagyashr scheme reached 784 houses i 
विदर्भ

"माझी कन्या भाग्यश्री' पोहोचली 784 घरांत; मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी शासनाचा उपक्रम

सूरज पाटील

यवतमाळ : मुलगी प्रत्येक क्षेत्रात भरारी घेत आहे. तरीदेखील कुटुंबात वंशाचा दिवाच हवाच, असा अट्टाहास आजही सुक्षिक्षित व्यक्तीकडून केला जातो. त्यामुळे पुरुष, स्त्री जन्मदरात तफावत आढळून येते. मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी महिला व बालविकास विभागाने सुरू केलेली "माझी कन्या भाग्यश्री' योजना जिल्ह्यात 784 घरांत पोहोचली आहे. एकूण लाभाची रक्कम एक कोटी 60 लाख 25 हजार रुपये इतकी आहे.

गेल्या 2017-2018 या वर्षात 389 लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात 88 लाख रुपये जमा करण्यात आले. 2018-2019मध्ये 53 लाभार्थींच्या खात्यात 15 लाख 75 हजार, तर 2019-2020 या वर्षांत 231 लाभार्थ्यांच्या खात्यात 56 लाख 50 लाख याप्रमाणे रक्कम जमा करण्यात आली. 2020-2021 या वर्षांत महिला व बालकल्याण विभागाकडे 111 प्रस्ताव आलेले आहेत. 42 लाभार्थ्यांचे प्रस्ताव बॅंकेकडे सादर करण्यात आले. 

69 प्रस्ताव कार्यवाहित आहेत. मुलींचा जन्मदर वाढविणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन, मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविण्यासाठी "माझी कन्या भाग्यश्री' ही योजना एक ऑगस्ट 2017 पासून सुधारीत स्वरूपात सुटसुटीत केली. पहिली व दुसऱ्या मुलीनंतर शस्त्रक्रीया केल्यास योजनेचा लाभ मिळतो. मुलीचा विवाह 18 वर्षापर्यंत होता कामा नये, ही अट ठेवण्यात आली. त्यामुळे बालविवाहालादेखील प्रतिबंध घालण्यात आला. 

सात लाख 50 हजार रुपये वार्षिक उत्पन्न असलेले घटकही योजनेसाठी पात्र आहेत. विधवा महिलेने पती निधनाचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर केल्यास कुटुंब नियोजन प्रमाणपत्राची मागणी करण्यात येत नाही. ज्या कुटुंबात एक ऑगस्ट 2017पूर्वी एक मुलगी आहे व एक ऑगस्टनंतर दुसऱ्या मुलीचा जन्म झाल्यास, माता पित्याने कुटुंब नियोजनाचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर दुसऱ्या मुलीला 25 हजार रुपये इतका योजनेचा लाभ अनुज्ञेय आहे. 

सावित्रीबाई फुले कन्या पारितोषिक योजना एक ऑगस्ट 2017पासून सार्वजनिक आरोग्य विभागाने बंद केली. त्यामुळे या योजनेचा लाभ घेतला नाही, या प्रमाणपत्राची मागणी करण्याची सक्ती नाही.

मुलगी मुलापेक्षा कुठेही कमी नाही. तरीदेखील मुलीचा जन्मदर कमी आहे. मुलींचा जन्मदर वाढविणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन, मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविण्यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना राबविली जाते.
- विशाल जाधव, 
उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग, जि. प. यवतमाळ. 


संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Facebook, Insta बंदचा राग, आंदोलक घरांना लावतायत आग! ५ मंत्र्यांचा राजीनामा, पंतप्रधान देश सोडण्याच्या तयारी

Shreyas Iyer: 'KKR संघांच्या मिटिंगचा भाग असायचो, पण...', श्रेयसने केला मोठा खुलासा; पंजाबबद्दलही स्पष्ट बोलला

बापरे! काजल अग्रवालचं अपघाती निधन? सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी वाहली श्रद्धांजली, अभिनेत्री सर्वांनाच सुनावलं

Devendra Fadnavis: शेतकऱ्यांनो लगेच बँक खाते तपासा, केंद्रानंतर राज्य सरकारकडून दोन हजार रुपये जमा

Nepal Protests : नेपाळ पेटले ! Zen-G आंदोलकांचा राष्ट्रपती निवासस्थानावर कब्जा, कायदा मंत्र्याचे घरही जाळले; राजकीय संकट गडद

SCROLL FOR NEXT