Meat eating at the headquarters of Sarvaseva Sangh at Sevagram 
विदर्भ

सेवाग्राम येथील सर्वसेवा संघाच्या मुख्यालयात मांसाहार? प्रदीप बजाज यांचा आरोपाने खळबळ

रूपेश खैरी

वर्धा : शांती, अहिंसेचा, संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा आश्रम असलेल्या सेवाग्राम येथील सर्वसेवा संघाच्या मुख्यालयात राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने मांसाहार झाल्याच्या आरोपाने नवा वाद सुरू झाला आहे. यानमित्ताने सर्व सेवा संघातील गटबाजी पुन्हा उफाळून आली आहे. प्रदीप बजाज यांनी हे आरोप एका पत्राद्वारे केले आहेत.

सर्व सेवा संघाच्या अध्यक्षपदावरून अगोदरपासून वाद सुरू आहे. एका गटानुसार प्रदीप बजाज हे अध्यक्ष आहेत, तर सर्व सेवा संघाच्या समितीने निवडलेले अध्यक्ष चंदन पाल हे आहेत. सेवा संघाच्या मते बजाज हे ‘स्वयंघोषित’ अध्यक्ष आहेत. त्यांनी मांसाहाराबाबत केलेले आरोप पूर्णत: तथ्यहीन असून त्याची करावी तेवढा निंदा कमी आहे, असे चंदन पाल यांनी सांगितले.

आचार्य विनोबा भावे यांनी महात्मा गांधी यांच्या मार्गदर्शनात सर्वसेवा संघाची स्थापना केली. सर्वसेवा संघामार्फत राबविलेल्या भूदान चळवळीत मिळालेल्या जमिनीच सर्वसेवा संघातील वादाचे कारण ठरत आहे. याच जमिनीच्या माध्यमातून आर्थिक सुबत्ता मिळविण्यासाठी काही राजकीय पदाधिकाऱ्यांच्या मदतीने चंदन पाल यांनी संस्थेचे अध्यक्षपद बळकाविल्याचा आरोप बजाज यांनी एका पत्रातून केला आहे.

तसेच आसाममधील हिंसाचारग्रस्त कोकराझार येथे शांती प्रस्थापित करण्यासाठी गोळा केलले लाखो रुपये पाल यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या बॅंक खात्यात जमा करून त्याचाही अपहार केल्याचा आरोपसुद्धा या पत्रात केला आहे. 

आरोप कधीच सत्य होऊ शकत नाहीत
प्रदीप बजाज यांचा सर्वसेवा संघाशी कुठलाही संबंध नाही. त्यांनी केलेले आरोप हे तथ्यहीन आहे. त्यांनी केलेले आरोप कधीच सत्य होऊ शकत नाहीत. 
- चंदन पाल,
अध्यक्ष, सर्वसेवा संघ, सेवाग्राम

आठवलेंची विचारणा

रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी भूदान मंडळाला मिळालेली ४६ लाख एकर जमीन कुणाला वाटण्यात आली, अशी विचारणा एका पत्राद्वारे केली आहे. याबाबत आठवले महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी कळविल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक मेश्राम यांनी दिली.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Changes: गणेशोत्सवात पुण्यात मोठा वाहतूक बदल; 12 ते 26 सप्टेंबरपर्यंत 'या' रस्त्यांवर जड वाहनांना बंदी

रखडलेल्या ठाकुर्ली उड्डाणपुलाला मुहूर्त, सात खासगी मिळकतींचा प्रश्न मार्गी; १० वर्षांचा तिढा सुटला

iPhone 18 लाँच होताच जुन्या iPhoneच्या किमती वाढल्या! iPhone 17, iphone 17 pro सह कोणते मॉडेल महागले?

Marathi News Live Updates :गौतमी पाटलांविरोधात भाजप नेत्या आक्रमक, अश्लील हावभाव केल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार

क्रिकेटच्या कारभारात मोठा बदल होणार? सर्वोच्च न्यायालयाने BCCIसमोर उपस्थित केला ‘हा’ सवाल; १२ वर्षांपासून प्रलंबित प्रकरण पुन्हा चर्चेत

SCROLL FOR NEXT