Ambulance 
विदर्भ

मेळघाटात भंगार वाहनांतून होतेय रुग्णसेवा; डॉक्टरांसह रुग्णांचाही जीव धोक्‍यात

राज इंगळे

अचलपूर (जि. अमरावती) ः मेळघाटच्या अकरा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत भरारी पथकातील डॉक्‍टरांना भाडेतत्त्वावर खासगी वाहनांची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, भाडेतत्त्वावर घेण्यात आलेली वाहने मागील तीन- चार वर्षांपासून टेंडर प्रक्रियेअभावी जुनेच आहे. त्यातील बहुतांश वाहने खिळखिळे झाल्याने रुग्णांसह डॉक्‍टरांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन रुग्णांची तथा डॉक्‍टरांची होणारी गैरसोय तत्काळ दूर करण्याची गरज निर्माण झाली आहे.

मेळघाटातील दुर्गम भागात जेथे उपचार करण्यासाठी व दळणवळणाची साधने सहज उपलब्ध होत नाहीत, अशा ठिकाणच्या गर्भवती महिलांना प्रसूतीकळा सुरू झाल्यास रुग्णालयापर्यंत पोहोचणे अधिक जिकिरीचे होते. याची दखल घेऊन आरोग्य विभागाने २५ जून १९९५ ला नवसंजीवनी योजनेअंतर्गत भरारी पथकाची स्थापना केली होती. त्या योजनेअंतर्गत डॉक्‍टरांची नियुक्ती करण्यात आली होती. सोबतच त्यासाठी भाडे तत्त्वावर खासगी वाहनांची सोय उपलब्ध करून दिली होती. यामध्ये जवळपास मेळघाटात २२ डॉक्‍टरांसाठी २२ खासगी वाहने उपलब्ध करून दिली आहेत.

वाहनांसाठी नियमाप्रमाणे दरवर्षी टेंडर प्रक्रिया राबवावी लागते. टेंडर प्रक्रिया सुरळीत चालू होती, मात्र तीन- चार वर्षांपासून टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली नसल्याने २०१० वर्षांपूर्वीचीच वाहने डॉक्‍टरांच्या दिमतीला आहेत. यातील बहुतेक वाहने खिळखिळे झाल्याने रुग्णांसह डॉक्‍टरांचा जीव धोक्‍यात आला आहे. 

एखाद्या वेळेस काही अनुचित घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याकडे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. या गंभीर बाबीकडे वेळीच लक्ष दिल्यास होणाऱ्या अनुचित घटनेला पायबंद बसू शकतो. अन्यथा या खिळखिळ्या वाहनांमुळे एखादी मोठी घटना घडण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. याकडे आरोग्य विभागाने लक्ष देऊन दहा वर्षे जुने झालेले वाहने बंद करून नव्याने टेंडर प्रक्रिया राबवून नवीन वाहने उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली आहे.

मेळघाटात अकरा प्राथमिक आरोग्य केंद्रांअंतर्गत एकूण २२ भरारी पथकातील डॉक्‍टरांसाठी वाहने उपलब्ध करून दिली आहेत. मागील काही वर्षांपासून विविध कारणांमुळे टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली नाही. आता मात्र प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरच वाहने भाड्याने घेण्यासाठी टेंडर प्रक्रिया राबविण्याचे आदेश वरिष्ठांच्या आदेशाने दिले आहेत.
- सुभाष पाटील, वरिष्ठ सहायक, वाहन शाखा, जि. प. अमरावती.

मेळघाटातील आरोग्याच्या दृष्टीने व्यवस्थित वाहने मिळावीत याकरिता यावर्षीपासून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना स्थानिक स्तरावर टेंडर प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले आहेत. मात्र टेंडर प्रक्रिया का राबविण्यात आली नाही, याची चौकशी करण्यात येईल.
- डॉ. दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी

संपादन ः राजेंद्र मारोटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माने इतिहास रचला; ट्वेंटी-२०तील सर्वात वेगवान शतक!मोडला रोहित शर्माचा विक्रम, विराटशी बरोबरी

Pune Ganeshotsav Traffic : पुण्यात गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीत मोठा बदल; 18 ते 25 सप्टेंबरदरम्यान 'हे' प्रमुख रस्ते राहणार बंद, जाणून घ्या महत्त्वाचे पर्यायी मार्ग

Gangapur Sugar Mill: गंगापूर सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त करण्याचा निर्धार; जय हिंदने गाळप केलेल्या ऊसाचे बिल १५ दिवसांत देण्याचे आश्वासन

Social Media Ban : मुलांचं मानसिक आरोग्य धोक्यात? 13 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी; किशोरवयीनांसाठीही कडक नियम, EU Kids Act मध्ये काय आहे?

Latest Marathi News Update : वाघूळखेडा शिवारात शेतात काम करणाऱ्या मजुरांवर कोसळली वीज; दुर्घटनेत तीन महिलांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT