Men inform sand smugglers about Police and Officers by using mobile in Amravati  
विदर्भ

मोबाईलमुळे वाळूचोरीचा व्यवसाय जोरात; खबरी ठेवतात अधिकारी व कर्मचाऱ्यांवर लक्ष

सायराबानो अहमद

धामणगावरेल्वे (जि. अमरावती) ः सरकारी यंत्रणेपेक्षाही कितीतरी पट जलदगतीने माफियांची यंत्रणा चालते. लोकेशनमुळे वाळूने भरलेली वाहने सुसाट धावतात. मोबाइलमुळे वाळूतस्करांचा अवैध धंदा अगदी सोयीस्कर बनला आहे. त्यांचे खबरीलाल' मोबाइलवर संवाद साधून अधिकारी व कर्मचारी या रस्त्याने येत असल्याची माहिती क्षणात पोहोचवितात. त्यामुळे अडथळा निर्माण होत नाही.

वाहनांचा मार्ग बदलला जातो. बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी पॉइंट नेमण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी माफियांचे चेले करडी नजर ठेवून असतात. याचा प्रत्यय मंगळवारला (ता. पाच) आला. जिल्हाधिकारी अमरावती, एनडीआरएफचे पथक उपविभागीय अधिकारी इब्राहीम चौधरी यांच्या नेतृत्वात पोहोचण्याच्या अगोदरच तालुक्‍यातील चिंचोली व विटाळा येथील वाळूघाटावरून जवळपास 25 बोटी सोडून मजूर व वाळूमाफियांनी पळ काढला.

अधिकाऱ्यांची अथवा पथकाची गाडी निघाल्यास तातडीने सर्व पॉइंटवर असलेल्या खबऱ्यांना लोकेशन कळते. हे वाहन कोणत्या रस्त्याने निघाले याची क्षणाक्षणाला माहिती पुरवली जाते. मोबाइलमुळे वाळू तस्करांचा अवैध धंदा अगदी सोयीस्कर बनला आहे. त्यांचे खबरीलाल मोबाइलवर संवाद साधून अधिकारी, कर्मचारी या रस्त्याने येत असल्याची माहिती क्षणात पोहोचवितात. त्यामुळे अडथळा निर्माण होत नाही.

वाहनांचा मार्ग बदलला जातो. बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी पॉइंट नेमण्यात आले आहेत. नदीपात्रातील विविध ठिकाणांहून वाळू उपसून वाहतूक केली जात आहे. आतापर्यंत हजारो ब्रांस वाळू माफियांनी आपल्या घशात घातली आहे. वाळूघाटांचे लिलाव करण्याची प्रक्रिया जवळ येईपर्यंत वर्धा नदीपात्रातील वाळू अर्ध्यावर रिकामी झालेली असेल, अशी चर्चा होत आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT