Men messed with the toll Operator on Nagpur Amaravati Highway  
विदर्भ

ब्रेकिंग: फास्टटॅगच्या रांगेत वाहन लावण्यावरून टोलनाक्यावर तरुणांचा प्रचंड राडा;  कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की

प्रशिक मकेश्वर, सकाळवृत्तसेवा

तिवसा (जि. अमरावती) : अमरावती-नागपुर राष्ट्रीय महामार्ग सहावर असलेल्या नांदगाव पेठ आयआरबी टोल नाक्यावर नागपूर वरून अमरावती कडे जाणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्स मधील काही तरुणांनी टोल नाक्यावर गोंधळ घातल्याचा प्रकार आज दुपारी समोर आला आहे. 

फास्टटॅगच्या रांगेतून वाहन लावण्यावरून हा गोंधळ झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.मात्र तरुणांनी घातलेल्या या राडामुळे काही वेळ वाहतूकीची कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.

सध्या टोल नाक्यावर फास्टटॅगमुळे इतर लेनवरून निघण्याकरिता वाहन चालकांना चागलीच वाट पाहावी लागत आहे यामुळे टोलवर वाहणाच्या मोठ्या रांगाच्या रांगा पाहायला मिळत आहे यामुळेच संतप्त झालेल्या आज दुपारी 2 वाजताच्या सुमारास नागपुर वरून अमरावतीच्या दिशेने जाणारी एक खासगी ट्रॅव्हल्स ही नांदगाव पेठ ट्रोल नाक्यावर आली.याच दरम्यान या नाक्यावर एक ट्रक होता तो ट्रक कुठल्या लेन मधून टाकायचा हे चालकाला सुचत नव्हते. 

यादरम्यान काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. त्याच रागाच्या भरातून ह्या ट्रॅव्हल्स मधील तरुणांनी खाली उतरून टोल नाक्यावर धुडगूस घातली तर काही तरुण अक्षरशः टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या अंगावर जाऊन मारहानीचा देखील प्रयत्न केला.या ठिकाणी सुमारे 15 मिनिट गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.त्यामुळे टोल नाक्यावर गोंधळ उडाला होता.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

देशात लॉकडाऊन लागणार का? PM मोदींनी घेतलेल्या बैठकीत काय झालं? CM फडणवीसांनी दिली माहिती

स्टार प्रवाहवरील या अभिनेत्रीने गुपचूप उरकलं लग्न ! ठाण्यातील प्रसिद्ध व्यावसायिकाशी बांधली लग्नगाठ

Nagpur News : नागपुरात 'डिजिटल अरेस्ट'चा थरार! आतंकवादाच्या खोट्या केसची भीती दाखवून महिलेला १३ लाखांचा गंडा; बनावट 'अरेस्ट ऑर्डर'ने उडविली झोप

Ambethan News : भामा आसखेडमध्ये 'साठीत' साठा, पण भविष्यात चिंतेची लाट! मोठ्या पाणी योजना सुरू होताच धरण तळ गाठणार; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Jayant Patil : आदिवासी जमिनींचा मोठा घोटाळा उघडकीस? सभागृहात घणाघाती आवाज; जयंत पाटील यांचा प्रशासनावर थेट हल्ला!

SCROLL FOR NEXT