bacchu kadu in akola.jpg 
विदर्भ

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना केले महत्त्वाचे आवाहन...वाचा

सकाळ वृत्तसेवा

अकोला : कपाशी पिकावर शेंद्री (गुलाबी) बोंडअळीचा प्रादुर्भाव होवू नये, यासाठी कपाशीची पूर्व हंगामी लागवड करू नये, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले आहे.

अकोला जिल्ह्यामध्ये 1.60 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगाम 2020 मध्ये कपाशी पिकाचे लागवडीचे लक्ष ठेवण्यात आले आहे. त्यापैकी 70 टक्के क्षेत्र कोरडवाहू व 30 टक्के क्षेत्र ओलीत आहे. शासनाने जिल्ह्यासाठी आठ लाख बियाणे पॅकेट्सचे आवंटन दिले आहे. त्यानुसार जिल्ह्यामध्ये खाजगी बियाणे उत्पादक कंपन्यांकडून 1.60 हेक्टर क्षेत्रासाठी 8 लाख बियाणे पॅकेटस वितरकांकडे पोहच झाले आहेत. त्यामुळे कापूस बियाण्याचा मुबलक पुरवठा जिल्ह्यामध्ये झाला आहे. 

तथापी, कपाशी बियाण्याची उपलब्धता भरपूर प्रमाणात असून जिल्ह्याला बियाणे कमी पडणार नाही, कुठेही तुटवडा भासणार नाही. केंद्र शासनाने कपाशी बियाण्याच्या किंमती ठरवून दिल्या आहेत. त्या बीजी 1 साठी 635 रुपये प्रति पॅकेट व बीजी 2 साठी 730 रूपये प्रति पॅकेट अशा आहेत. जिल्ह्यामध्ये बियाणे विक्री परवानाधारक 640 असून त्यांच्यामार्फत बियाणे उपलब्ध होणार आहे, असे पालकमंत्री ना. कडू यांनी स्पष्ट केले आहे.

जीवनचक्र खंडीत करणे आवश्‍यक
गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कपाशी पिकावर होवू नये यासाठी बोंडअळीचे जीवनचक्र खंडीत करणे हा एकमात्र चांगला यशस्वी उपाय आहे. सन 2017-18 मध्ये जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होवून कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यांची पुनरावृत्ती होवू नये यासाठी पूर्व हंगामी कपाशी लागवड करू नये, असे आवाहन पालकमंत्री कडू यांनी केले आहे.

जून महिन्यात बियाण्यांची विक्री
आता 15 मेपर्यंत वितरकांपर्यंत बियाणे उपलब्ध होतील व 30 मेपर्यंत विक्री केंद्रावर उपलब्ध होईल. मागील वर्षी ज्याप्रमाणे 1 जूननंतर प्रत्यक्ष शेतकरी बांधवांना कपाशी बियाण्यांची विक्री केली होती. त्याप्रमाणे यावर्षी केली जाईल. त्यामुळे शेतकरी बांधवांनी बियाणे संदर्भात कोणतीही काळजी करू नये व हंगामपूर्व कपाशी लागवड करू नये असे आवाहन पालकमंत्री कडू यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates : हिंदीविरोधातील स्टॅलिन यांच्या लढ्याला आमच्या शुभेच्छा - संजय राऊत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT