राज्यात आघाडी सरकार असतांना आमदार मदन येरावार पालकमंत्री कसे असा सवाल जनतेतून केल्या जात आहे. काहींनी तर बुद्धिपुरस्कर केला असल्याचा आरोप सुद्धा केला आहे. 
विदर्भ

वणीच्या आमदारांना पडला जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या विसर; फलकावर झळकलं मदन येरावारांचं नाव 

सकाळ डिजिटल टीम

मारेगाव (जि. यवतमाळ): तालुक्यातील नवरगाव मध्यम प्रकल्प येथुन करणवाडी या गावाकरिता खनिज विकास निधीतून नळयोजना राबविण्याकरिता ता.३१ मार्च रोजी वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार याच्या हस्ते भूमिपूजन पार पडले. परंतु येथिल फलकावर आमदार मदन येरावार यांच्या नावासमोर पालकमंत्री असे नमुद केले आहे. या विषयी परिसरात वेगवेगळ्या चर्चा होतांना दिसत आहे.

नवरगाव मध्यम प्रकल्प येथे  करणवाडी गावा करीता नळयोजनेचा भूमिपूजन समारंभ पार पडला.फलकावर आमदार मदन येरावार यांच्या नावासमोर पालकमंत्री यवतमाळ जिल्हा असे नमुद केल्या गेले आहे. राज्यात आघाडी सरकार असतांना आमदार मदन येरावार पालकमंत्री कसे असा सवाल जनतेतून केल्या जात आहे. काहींनी तर बुद्धिपुरस्कर केला असल्याचा आरोप सुद्धा केला आहे.

सत्ता समिकरण बदलाचे संकेत तर नाहीत असेही बोलल्या जात आहे. समाज माध्यमावर येथिल समारंभाचे फोटो प्रसारीत होताच विविध चर्चेला पेव फुटणे चालु झाले आहेत.माजी आमदार विश्वास नांदेकर विद्यमान खनिज प्रतिष्ठानचे सदस्य असतांना विजय पिदूरकर यांना फलकावर सदस्य खनिज प्रतिष्ठान असे नमुद केले आहे. या बाबीला राजकीय वळण येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

नवरगाव मध्यम प्रकल्प येथे करणवाडी गावा करीता नळ पाणी पुरवठा योजने करीता विहिरीच्या  भूमीपूजन पार पडले. येथे लावण्यात आलेला फलकावरील काही बाबी चुकीने नमुद झाल्या आहेत. मंजुरात जुनीच होती परंतु गावाच्या राजकीय हेव्यामुळे काम झाले नव्हते. आता या कामाला सुरुवात झाली आहे.
-ज्ञानेश्वर चिकटे 
भाजपा मारेगाव तालुका अध्यक्ष

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

Latest Marathi News Live Update : मुंबईत कंत्राटदाराचा सातवा बळी, सरकारची ८६ हजार कोटींची थकबाकी

मोठा अनर्थ टळला... जुई गडकरीच्या विमानात बिघाड? कॅप्टनने वाचवलं, अभिनेत्रीच्या पोस्टने चाहते चिंतेत

SCROLL FOR NEXT