molestation of a woman in Amravati 
विदर्भ

माणुसकी संपली... मोठ्या मुलाच्या मृत्यूपत्रासाठी धडपडणाऱ्या आईवरच बलात्कार

संतोष तपकिरे

वरुड (जि. अमरावती) : तालुक्‍यातील 22 वर्षीय युवकाचा अपघातात मृत्यू झाला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंदही केली. मुलाच्या मृत्यूचे कागदपत्र मिळविण्यासाठी आई प्रयत्न करीत होती. मात्र, अपयश येत होते. काय करावे आणि काय नाही, असा विचार तिच्या मनात येत होता. अशात एकाने तिला "माझा मित्र पोलिस आहे, त्याच्या माध्यमातून लवकरात लवकर कागदपत्र मिळवून देतो' अशी बतावणी केली आणि बलीत्कार केला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाच्या मृत्यूपत्राचे कागदपत्र मिळविण्यासाठी आई धडपड असल्याची माहिती आमनेर येथील मनोज गुल्हाने याला मिळाली. त्याने महिलेचा फायदा घेण्याचे ठरवले. "माझा मित्र पोलिस आहे, मी त्याच्या माध्यमातून तुला सर्व कागदपत्रे मिळवून देतो. टेन्शन घेऊ नको', असे आश्‍वासन दिले. मुलाच्या मृत्यूचे कागदपत्र मिळणार या आशेने आई दुसऱ्या मुलाला सोबत घेऊन वरुडला आली.

तहसील कार्यालयात महिला येताच मनोज गुल्हाने याने त्यांना दुचाकीवर बसवून कुबडे चौक नजीकच्या मेनरोड परिसरातील खोलीत नेले. महिला तिच्या मुलाला घेऊन खोलीत गेली. खोलीत अगोदरच एक इसम झोपलेला होता. काही वेळांनी महिला बाजूलाच असलेल्या एका बाथरूममध्ये गेली.

ही संधी साधून मनोज गुल्हाने हा सुद्धा बाथरूममध्ये गेला. त्याने महिलेवर बलात्कार केला. मुलगा परत आल्यानंतर महिलेने घडलेली आपबीती सांगितली. यानंतर दोघांनी थेट वरूड पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी मनोज गुल्हाने (40, रा. आमनेर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याला अटक करण्यात आली आहे.

मटणाची पार्टीचा आखला बेत

मनोज गुल्हाने हा महिलेला खोलीत घेऊन गेल्यानंतर तिथेच थांबायला सांगितले. आपण मटणाची पार्टी करू असे सांगून तिच्या मुलाला दुचाकीवर सोबत घेऊन गेला. बाजारातून मटण खरेदी केल्यानंतर दोघेही खोलीत परत आले. काही वेळातच मटणाची भाजी तयार केली. दारू विसरल्याचे सांगून महिलेल्या मुलाला दारू घेण्यासाठी पाठवले. मुलगा दारू आणण्यासाठी बाजारात गेला असता बलात्कार केला. 

आरोपीला पोलिसांनी केली अटक

"माझा मित्र पोलिस आहे. त्याच्या माध्यमातून मृत मुलाचे कागदपत्रे देतो, अशी बतावणी करून 50 वर्षीय महिलेला शहरातील कुबडे चौक नजीक मेनरोड परिसरातील एका घरी बोलावून बलात्कार केला. वरुड पोलिसांनी आमनेर येथील मनोज विनायक गुल्हानेविरुद्ध बलात्कारासह ऍक्‍टासिटी ऍक्‍ट अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. 

संपादन - नीलेश डाखोरे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

Latest Marathi News Updates: गेवराईच्या पूरग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT