विदर्भ

विदर्भात १५ जूनपर्यंत मॉन्सून धडकणार? हवामान विभागातर्फे संकेत

नरेंद्र चोरे

नागपूर : नैऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सून (Monsoon) यंदा निर्धारित वेळेत अंदमानमध्ये दाखल झाला असून, याच गतीने पुढेही प्रवास कायम राहिल्यास मॉन्सून १५ जूनच्या आसपास विदर्भात धडकण्याची शक्यता आहे. तसे संकेत प्रादेशिक हवामान विभागातर्फे देण्यात आले आहे. (Monsoon to hit Vidarbha till June 15?)

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मॉन्सूनने २१ मे रोजी अंदमान व निकोबार बेटात प्रवेश केला असून, आतापर्यंतचा प्रवास योग्य दिशेने सुरू आहे. मॉन्सूनची प्रगती पुढेही अशीच कायम राहिल्यास येत्या एक जूनपर्यंत केरळमध्ये आगमन अपेक्षित आहे. त्यानंतर मॉन्सून कोकणमार्गे महाराष्ट्राच्या सीमेत दाखल होणार आहे. साधारणपणे केरळमधून विदर्भात यायला किमान पंधरा दिवसांचा अवधी लागतो.

प्रवासात कसलाही अडथळा न आल्यास येत्या १५ जूनच्या आसपास विदर्भात मॉन्सून दाखल होण्याची दाट शक्यता आहे. मध्ये कमजोर पडल्यास थोडा उशीरही होऊ शकतो, असे प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या 'यास' चक्रीवादळाचाही मॉन्सूनच्या प्रवासावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

विदर्भाच्या मॉन्सूनच्या गेल्या दशकातील इतिहासावर नजर टाकल्यास दोन-तीन वर्षांचा अपवाद वगळता मॉन्सूनचे वेळेत आगमन झाले आहे. दरम्यान, राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत असल्याने पुढील तीन-चार दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. विदर्भातही २७ मेपासून वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

विदर्भात दशकातील मॉन्सूनचे आगमन

वर्ष तारीख

२०२० १२ जून

२०१९ २२ जून

२०१८ ८ जून

२०१७ १६ जून

२०१६ १८ जून

२०१५ १३ जून

२०१४ १९ जून

२०१३ ९ जून

२०१२ १७ जून

२०११ १५ जून

Monsoon to hit Vidarbha till June 15?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात सभा

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT