mool police search boy who lost from home in chandrapur 
विदर्भ

रस्ता भटकलेला 'जान' तासाभरातच आईच्या कुशीत, मूल पोलिसांच्या प्रयत्नाला यश

विनायक रेकलवार

मूल ( जि. चंद्रपूर ) : गाव नवीन, रस्ता नवीन आणि घराशेजारील माणसेही नवीन. अशा परिस्थितीत रस्ता चुकलेला एक तीन वर्षीय जान नावाचा मुलगा रडत बसलेला असताना त्याला एका तासाच्या आत आईच्या कुशीत सुखरूप पोहोचविण्याची किमया मूल पोलिसांनी साधली आहे. 

भटकलेला जान आईच्या कडेवर पाहून कुटुंबीयांनीसुद्धा आनंद व्यक्त करीत मूल पोलिसांचे आभार मानले आहेत. ही घटना शनिवारी (ता. 21) सकाळी घडली. सिंदेवाही तालुक्‍यातील पेटगाव येथील मेश्राम परिवार मूल येथील नातेवाईकांकडे भाउबिजेनिमित्त आले होते. त्यांचे नातेवाईक कृषी  उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात राहतात. शनिवारी सकाळी याच परिसरात एक तीन वर्षीय मुलगा घाबरलेल्या अवस्थेत रडत बसलेला आढळला. या परिसरात राहणारे रवी मेश्राम यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने मूल पोलिसांना याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस उपनिरीक्षक राठोड यांनी घटनास्थळ गाठून मुलाला ताब्यात घेतले. विश्‍वासात घेऊन मुलाची चौकशी केली असता त्याचे नाव जान प्रमोद मेश्राम (रा. पेटगाव)असे असल्याचे समजले. परंतु, मुलाच्या आई वडीलांचा शोध घेण्याचे आव्हान समोर असताना त्यांनी एक तासाच्या आत पालकांचा शोध घेतला. 

सर्व चौकशीअंती जानला आई वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. अनोळखी परिसरामुळे रस्ता चुकलेला जान आईच्या कुशीत जाताच त्याच्या चेहऱ्यावर आनंदाचे कारंजे उडायला लागले. कुटुंबीयांनीही भटकलेला जान मिळताच त्यांच्याही जीवात जीव आला.  पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे मुलगा सुखरूप मिळाल्याने मेश्राम कुटुंबीयांनी पोलिसांचे आभार मानले. ही मोहीम पोलिस निरीक्षक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय राठोड, सहकारी पोलिस कर्मचारी शाफिक, संजय, शालिनी यांनी राबविली.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China reaction on Nepal Political Crisis: नेपाळमध्ये अराजकता अन् सत्तेची उलथापालथ; अखेर चीनलाही सोडावं लागलं माैन!

Pune News : दीड वर्षात तब्बल चाळीस हजाराहून नागरिक जखमी, मोकाट कुत्र्यांचा उपद्रव; नगरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Nandgaon News : कन्नड घाटाच्या वाहतुकीने नांदगावचे रस्ते गिळले: प्रवाशांचे हाल

Suspicious toolkit: नेपाळ, बांगलादेश अन् श्रीलंकेतील आंदोलनांमध्ये धक्कादायक साम्य; पंतप्रधानांच्या माजी सल्लागारांचा दावा

Pollution Control : 'नो पीयूसी... नो फ्युएल' उपक्रम प्रभावीपणे राबविणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

SCROLL FOR NEXT