mortal of woman found in River of Kaudanyapur in Amravati  
विदर्भ

कौडण्यपूरच्या नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; अद्याप पटली नाही ओळख 

प्रशिक मकेश्वर

तिवसा (जि. अमरावती) : तिवसा तालुक्यातील कौडण्यपूर नदीच्या अस्ती घाटवर आज एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे घटनेचा पंचनामा करून कुऱ्हा पोलिसांनी  महिलेच्या शोधप्रत्रिका प्रसिद्ध करत ओळख पटल्यास कुऱ्हा पोलिस स्टेशनंशी संपर्क करण्याचे आव्हान केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाबुराव ठाकरे पोलिस पाटील यांच्या प्राप्त तक्रारीनुसार  दिनांक 12जानेवारी रोजी  सकाळी 8:30 वाजता दरम्यान कौडण्यपूर बसस्टॉपवर च्या पानटपरीवर चर्चा करत असताना दोन व्यक्तीनी माहिती दिली की कौडण्यपूरच्या नदी पात्रातील अस्ती विसर्जन घाट स्थळी एका महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले.

याची माहिती कुऱ्हा पोलिस स्टेशनला देण्यात आली तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढून घटनेचा पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे मृतक महिलेचा वर्णन याप्रमाणे वय 40 ते 45 दरम्यान असून बांधा मध्यम, रंग सावळा, उंची पाच फूट दोन इंच,चेहरा गोल,कपाळावर लाल रंगाची टिकली, आहे. 

केस काळे पांढरे,नाकात पिवळ्या धातूची बेसर,गळ्यात काळे मणी पिवळ्या धातूची पेडॉल असलेली पोत, डाव्या हातांच्या बोटात चंदेरी धातूची अंगठी,पायात चंदेरी धातूच्या तोरड्या,असं  वर्णन असलेल्या अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला असून या महिलेची ओळख पटल्यास कुऱ्हा पोलीस स्टेशनंशी संपर्क करावा असं आवाहन करण्यात आलं आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Purandar Airport: पुरंदर विमानतळाच्या जागेला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा धक्का; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

Election Commission: आयुक्तांच्या नियुक्तीबाबत दोन प्रवाह; सर्वोच्च न्यायालयामध्ये कायदेशीर काथ्याकूट

Maharashtra Drought: दुष्काळ आढाव्याला आचारसंहितेचा फटका; कृषिमंत्र्यांच्या पुणे आणि नागपूर विभागाच्या नियोजित बैठका रद्द

Latest Marathi News Live Update : युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवलेंसह ३३ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे

Greater Noida Bus Fire : यमुना एक्सप्रेसवेवर धावत्या स्लीपर बसला भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू , जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी टाकल्या उड्या

SCROLL FOR NEXT