mothers day.jpg
mothers day.jpg 
विदर्भ

मातृदिन : आई माझी मायेचा सागर...पण आईबद्दल प्रेम मातृदिनीच का? दररोज का नाही

सागर कुटे

अकोला : कल्याणासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करणारी आई ही परमेश्वराचेच दुसरे रूप मानले जाते. आईबद्दल भरभरुन बोलले जाते ते म्हणजे ज्या दिवशी असतो मातृदिन. दिवसभर घरातील प्रत्येकाच्या आवडीनिवडी, गरजा लक्षात ठेवत राबराब राबणाऱ्या माऊलीसाठी हे प्रेम एकच दिवस पुरेसे का? 365 दिवस आपल्या हातात असतात. हे 365 दिवस आपल्या मुलावर प्रेम व्यक्त करायला ती विसरत नाही. मग तुम्ही का बघताय त्या एकच दिवसाची वाट, दररोज का साजरा होत नाही मातृदिन. ही एक शोकांतिकाच आहे.

आई रोजच आपल्यासाठी खूप काही करत असते. आपल्यासाठी तिळतिळ झीजत असते. मुलं कितीही मोठी झाली आणि त्यानाही मुलं झाली तरी तिचं आईपण कधीच संपत नाही. एखादा दिवस असा हवा की, तिच्यासाठी आपल्याला काही करता येईल. तिला खास वाटेल असे काहीतरी. या भावनेतून मदर्स डे साजरा केला जाऊ लागला. पाश्चांत्यांचे अनुकरण नको पण मदर्स डे मागचा उद्देश अतिशय चांगला असल्याने आपणही तो साजरा करायला काही हरकत नाही. मात्र त्या एकच दिवशी आईवर प्रेम करायचे का?

कोणताही विशेष दिवस असो, त्या दिवशी तो व्यक्ती, महापुरुषाची आठवण येते. मोठ्या धुमधाममध्ये तो दिवस साजरा करण्यात येतो. परंतु तो दिवस ओसरल्यानंतर त्या महापुरुषाबद्दल कोणी ब्र सुद्धा काढताना दिसत नाही. हे असे का होते. देशासाठी बलिदान देणारे वीर, महापुरुष असो की, सामाजिक कार्यातील अग्रेसर असणारे व्यकी, महिला या सर्वांना एकच न्याय दिला जातो. विशेष म्हणजे यांनी दिलेले उच्चविचारही आठवत नाही. असेच आई विषयी सुद्धा दिसून येते. या आधुनिक काळात अनेक मुले आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवायलाही विसरत नाही.

जगभरात मातृदिन मोठ्या उत्साहाने साजरा होतो. यंदाही हा दिवस जगभरात साजरा केला जाईल. यंदा 10 मे रोजी मदर्स डे साजरा केला जाणार आहे. या दिवशी अनेक जण सकाळी आईच्या आधी उठून तिच्यासाठी तिच्या आवडीची न्याहरी बनवू देतात. तिच्या आवडीच्या फुलांचा गुच्छ तिला भेट देतात, तसेच व्यस्त कामाच्या वेळापत्रकातून थोडासा वेळ काढून तिच्याशी मस्त गप्पा मारतात. तिला आवड असेल तर नाटकाला वा सिनेमाला नेतात. तिच्यापासून लांब असले तरी तिला फोन करून प्रेमही व्यक्त करतात. मात्र, इतर वेळी आई हा विषय आपण आपल्या सर्वसामान्य जगण्यात इतका गृहित धरलेला असतो की, त्याची वेगळी अशी दखलही आपल्याला घ्यावी वाटत नाही. अर्थात हे निरिक्षण सर्वांनाच लागू पडते असे नाही. 

ते म्हणतात ना, प्रेम भाव व्यक्त करण्यासाठी कोण्या दिवसाची गरज नसते. तसेच 365 दिवस प्रेम कोण्या ना कोण्या कृतीतून व्यक्त करता येऊ शकते. यामध्ये जेवताना आईने बनविलेल्या एखाद्या पदार्थाचे कौतुक करणे, जेवल्यावर किंवा इतर वेळी आईला घरकामात मदत करणे, तिचे श्रम कसे कमी होतील हे पाहणे, आपल्या आनंदात तिला सहभागी करून घेणे, तिच्या जवळ बसून संवाद साधणे अशा अनेक गोष्टीतून तो व्यक्त होत असतोच. तिने केलेल्या संस्कारात राहणे आणि त्या संस्कारांचे महत्त्व वेळोवेळी मान्य करणे हेही मनातील प्रेम भावदर्शकच आहे. म्हणून मातृदिन एकदिवस नाही तर दररोज साजरा करूयात.

कशी झाली मदर्स डेची सुरुवात?
मातृत्वदिनाची पहिली सुरुवात झाली ती अमेरिका देशात. अॅक्टिविस्ट अॅना जार्विस आपल्या आईवर खूप प्रेम करायची. तिने ना लग्न केले ना मुले जन्माला घातली. आईचा मृत्यू झाल्यावर तिने या दिवसाची सुरुवात केली. मग हळू हळू अनेक देशांमध्ये हा दिवस साजरा करायला सुरुवात केली.

मेच्या दुसऱ्या रविवारी का साजरा करतात मदर्स डे ?
9 मे 1914 रोजी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी एक कायदा पास केला. ज्यामध्ये लिहिले होते की, मेच्या दुसऱ्या रविवारी मदर्ड डे साजरा केला जाईल. त्यानंतर मदर्स डे अमेरिकासह इतर देशांमध्ये याचदिवशी साजरा केला जाऊ लागला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT