विदर्भ

म्युकरमायकोसिस रुग्णांची खासगीत धाव; आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत वाढ

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : कोरोनाच्या (coronavirus) दुसऱ्या लाटेनंतर तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त होत असताना जिल्ह्यात ‘म्युकरमायकोसिस’ (Mucor mycosis) आजाराचे रुग्ण आढळत आहेत. कोरोनावर मात केलेल्यांना ‘म्युकरमायकोसिस’ या आजाराचा सामना करावा लागत आहे. कोरोनानंतरच्या नवीन संकटावर मात करण्यासाठी तत्काळ निदान व उपचार करणे आवश्‍यक असल्याने रुग्ण खासगी डॉक्‍टरांकडे धाव घेत आहेत. (Mucous mycosis patients go to private hospital in Yavatmal)

कोरोनामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. दुसरी लाट रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. एप्रिल महिन्यात बेड, रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन मिळविण्यासाठी रुग्ण व नातेवाइकांना तारेवरची कसरत करावी लागली. मृत्यूच्या दाढेतून बाहेर आलेल्या रुग्णांना नवीनच संकटांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे आरोग्ययंत्रणेची चिंता आणखी वाढली आहे.

गंभीर रुग्णांवर शस्त्रक्रियादेखील करण्यात आली आहे. तर दोघांना आपला डोळा गमवावा लागला आहे. खासगीत सर्वाधिक गर्दी होत असताना जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडे आतापर्यंत केवळ सातच रुग्णांची नोंद झाली आहे. नाकातून काळ्या खपल्या पडणे व नाक कोरडे होणे, नाकातून रक्तमीश्रित सर्दी येणे, गालावरची संवेदना बदलणे, टाळूवर जखम होणे व ते काळे पडणे, अचानक दात दुखणे व ढिले पडणे, चेहऱ्यावर किंवा डोळ्यांवर सूज येणे, डोकेदुखी व ताप, चेहरा वाकडा होणे, डोळे लाल होणे, डोळा दुखणे व नजर कमजोर होणे आदी लक्षणे आहेत.

म्युकरमायकोसिस हा आजार ‘म्युकॉर’ नावाच्या बुरशीमुळे होतो. ही बुरशी काळी नसते. मात्र, या बुरशीमुळे बाधित भागाचा रक्तपुरवठा बंद होतो व तो भाग मृत होतो. रक्तपुरवठा नसल्याने तो भाग काळा दिसतो. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी झाली आहे. अशांना हा आजार आपल्या कवेत घेतो. कोरोनाबाधित रुग्ण, कॅन्सर रुग्ण, अवयव रोपण झालेले रुग्ण, अनियंत्रित रक्तातील साखर असणाऱ्या या रुग्णांना हा आजार व्हायची शक्‍यता जास्त असते.

कान, नाक, घसा तज्ज्ञांकडे धाव

कोरोना रुग्णांत म्युकरमायकोसिसचे प्रमाण जास्त आहे. कारण, कोरोनामध्ये रुग्णाच्या श्‍वसनमार्गाची प्रतिकारक्षमता कमी झालेली असते. शस्त्रक्रिया करून काळा झालेला भाग काढला जातो. या आजारावरील उपचाराचा खर्चही जास्त आहे. कसेबसे कोरोनातून वाचलो, आता ‘म्युकरमायकोसिस’मुळे उद्‌भवणारा धोका टाळण्यासाठी रुग्ण खासगी कान, नाक, घसा तज्ज्ञांकडे जाऊन उपचार घेत आहेत.

म्युकरमायकोसिस आजाराच्या सात रुग्णांची नोंद आतापर्यंत करण्यात आली आहे. त्यांच्यावर खासगी व वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करण्यात आले आहेत. खासगी रुग्णालयांना माहिती देण्यासंदर्भात कळविण्यात आले आहे.
- डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा शल्यचिकित्सक, यवतमाळ

(Mucous mycosis patients go to private hospital in Yavatmal)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: दुसऱ्याच षटकात गुजरातला मोठा धक्का; सिराजने बेंगळुरूला मिळवून दिली पहिली विकेट

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT