Murder of a youth over a money dispute Chandapur crime news 
विदर्भ

पैशाच्या वादातून युवकाचा खून; सहा तासांत ठोकल्या बेड्या

सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : जुनोना चौक परिसरातील पागलबाबानगरात पैशाच्या वादातून युवकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. घटनेनंतर आरोपी पसार झाला. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्याची जबाबदारी पोलिस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविली. त्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरवित पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वातील पथकाने अवघ्या सहा तासांत खून करणाऱ्यास बेड्या ठोकल्या. मूल तालुक्‍यातील मारोडा येथून अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव पवन रतन पाटील (वय २०) तर मृत्ताचे नाव सोनू राजू चांदेकर (वय २६) असे आहे.

बाबुपेठ परिसरातील तुकडोजी महाराज चौक परिसरात सोनू राजू चांदेकर हा वास्तव्यास होता. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. त्याच्यावर पोक्‍सो, अपहरण, बलात्काराचे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वीच तो कारागृहातून बाहेर आला होता. मंगळवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास मिस्त्री काम करणारा पवन रतन पाटील याला सोनू चांदेकर दिसला. त्यानंतर पवनने वाहन थांबवून जुन्या पैशाची मागणी केली. यावेळी पैशाच्या वादातून दोघांत शाब्दिक वाद झाला.

शाब्दिक वादावादीचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी पवनने सोनू याच्यावर चाकूने वार केले. यात सोनूचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर पवनने तेथून पळ काढला. इंदिरानगरातील एका मित्राकडे नवीन कपडे परिधान केले. त्यानंतर मूल तालुक्‍यातील मारोडा येथील एका मित्राच्या बहिणीकडे रात्री मुक्कामी गेला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी आरोपीला तातडीने अटक करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना दिल्या. त्यानंतर पोलिस निरीक्षक खाडे यांनी पोलिस उपनिरीक्षक संदीप कापडे यांच्या नेतृत्वात पथक गठित केले. खून करून आरोपी मारोडा येथे लपून असल्याची माहिती खाडे यांना मिळाली. त्यानंतर तातडीने पथक मारोडा येथे पोहोचले.

पवन पाटील याला अटक करून चंद्रपूर येथे आणून रामनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई सुरेश केमेकर, संजय आतकुलवार, मिलिंद चव्हाण, संजय वाढई, गोपाल आतकुलवार, नितीन रायपुरे, गोपीनाथ नराठे, मयूर येरणे, जमीर पठाण, अनुप डांगे, प्रदीप मडावी, गणेश मोहुर्ले, अमजद खान, राजेंद्र खनके, कुंदनसिंग बावरी यांच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT