Murder of a youth in a trivial dispute in Amravati 
विदर्भ

हटकल्यामुळे झाली शाब्दिक चकमक; काही वेळांनी निघाल्या तलवार व चाकू, मग...

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : कोरोनाच्या संसर्गामुळे सातत्याने प्रकाशझोतात येत असलेल्या ताजनगरात बुधवारी (ता. 20) रात्री दुसऱ्याच कारणाने चर्चेत आला. येथे क्षुल्लक कारणावरून युवकाचा खून झाल्याने चांगलीच खळबळ उडाली होती. सलमान खान वल्द इस्माईल खान (वय 19 रा. ताजनगर) असे मृत युवकाचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिजवान मोहंमद इलियास, मोनू उर्फ शोएब खान इब्राहीम हाजी, इमरान, इब्राहीम हाजी, इशाक पहेलवान, साजिद, जावेद रेतीवाला व राजा (सर्व रा. मुजफ्फरपुरा) अशा आठ जणांविरुद्ध पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यापैकी मोहंमद रिझवान व मोनू उर्फ शोएब खान या दोघांना हल्ल्यानंतर रात्रीच नागपुरीगेट पोलिसांनी अटक केली. उर्वरित सहा जण गुरुवारपर्यंत (ता. 21) पसार होते. शेख कालू उर्फ शेख छोटू (वय 37 रा. ताजनगर नं. एक) यांनी पोलिसात तक्रार नोंदविली.

ताजनगर चौकात पटेल मेडिकल स्टोअरसमोर ही घटना घडली. याठिकाणी घटनेच्या एक तासांपूर्वी शेख कालू याने मारेकऱ्यांपैकी काही जणांचा हटकले होते. त्यावेळी त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली होती. त्यानंतर काही वेळात सात ते आठ जणांनी तलवार, चाकू, काठ्यांसह ताजनगर येथील मेडिकल स्टोअरसमोर धाव घेतली. यानंतर शेख कालू व त्याच्या मित्रांसोबत वाद घातला. 

वाद वाढत असल्यामुळे शेजारी उभा सलमान खान वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी गेला. त्यामुळे चिडलेल्या आठ जणांनी सलमान खान याच्याशी वाद घालून त्याला मारहाण केली. एकाने चाकूने छातीत वार केला. त्यात गंभीर जखमी सलमानला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे इर्विन रुग्णालयासह ताजनगरात मोठा जमाव जमल्याने पोलिसांची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली. काही वेळाने तणाव निवळला.

जुनी पार्श्‍वभूमी नाही 
क्षुल्लक वादातून खुनाची घटना घडली. त्याला जुनी पार्श्‍वभूमी नाही. पसार हल्लेखोरांना शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 
- अर्जुन ठोसरे, 
पोलिस निरीक्षक, नागपुरीगेट ठाणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT