murdered her husband along with her boyfriend at gondia
murdered her husband along with her boyfriend at gondia 
विदर्भ

आग्रहाखातर तो सासरी राहायला गेला; मात्र, पत्नीचे दुसऱ्याशी सूत जुळल्याने घडला थरार...

सकाळ वृत्तसेवा

गोंदिया : मुलचंद गोमाजी शहारे याचा विवाह टेमणी येथील रहिवाशी युवतीशी झाला अन्‌ सुखी संसाराला सुरुवात झाली. मात्र, मुलचंदला दारूचे व्यसन जळले. यामुळे तो पत्नीला सतत मारहाण करीत होता. त्याच्या या सवयीला पत्नी पार कंटाळली होती. मागील चार महिन्यांपूर्वी तो पत्नीसह सासरी म्हणजे टेमणी येथे राहायला गेला होता. याच काळात त्याच्या पत्नीचे एका युवकाशी अनैतिक संबंध जुळले. अनैतिक संबंधात पती अडसर ठरत असल्याने पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचा काटा काढण्याचा प्लॅन रचना अन्‌ पुढील घटनाक्रम घडला... 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलचंद गोमाजी शहारे (वय 35) हा मूळचा गोंदिया जिल्ह्यातील कारंजा येथील रहिवासी आहे. त्याचे काही वर्षांपूर्वी टेमणी येथील युवतीशी लग्न झाले. लग्नाच्या काही महिन्यानंतरच त्यांच्यात वादाला सुरुवात झाली. कारण, मुलचंदला दारूचे व्यसन जळले होते. तो दारूच्या नशेत पत्नीला सतत मारहाण करीत होता. यामुळे पत्नी चिडली होती. ती चार महिन्यांपूर्वी पतीसह आपल्या माहेरी राहायला गेली.

आपल्या सासरी राहत असतानाही मुलचंदची दारूची सवय सुटली नाही. तो नेहमीच दारूच्या नशेत राहत होता. अशातच त्याच्या पत्नीचे परिसरातील सुरेश सीताराम नागरीकर (वय 45) याच्याशी सूत जुळले. मुलचंद दारूडा असल्याची संधी साधून त्याने संबंध जोडले. यानंतर त्यांच्या भेटीगाठी वाढायला लागल्या. याची कुणकूण मुलचंदला लागली. यामुळे तो पत्नीला सतत मारहाण करीत होता. पती आपल्याला मारहाण करीत असल्याची माहिती तिने प्रियकर सुरेशला दिली. यानंतर पत्नीने महिनाभरापूर्वी प्रियकरासोबत मिळून पतीचा काटा काढण्याचा प्लान रचला. 

सुरेशने आपल्या साथीदाराच्या मदतीने मुलचंदला खून केला आणि मृतदेह बरबसपुरा ते आंभोराकडे जाणाऱ्या नहराच्या पुलाखाली फेकून दिला. बरबसपुरा ते आंभोराकडे जाणाऱ्या नहराच्या पुलाखाली एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह फेकलेल्या अवस्थेत असल्याची माहिती गोंदिया ग्रामीण पोलिसांना मिळाली. माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासचक्रे फिरवून अवघ्या चार तासांत आरोपींच्या मुसक्‍या आवळल्या. मृताची पत्नी व प्रियकराने महिनाभराआधीच कट रचून त्याचा खून केल्याचे तपासात उघड झाले.

चार तासांत आरोपींना अटक

पुलाखाली मृतदेह मिळाल्यानंतर पोलिसांना तपासचक्र फिरवले. तसेच तीन पथक तपासासाठी गठित केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मृताची ओळख पटविण्यात यश आले व मृत मुलचंद हा सध्या टेमणी येथे राहात असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पथकाने टेमणी गाठून चौकशी केली. तेव्हा मुलचंद पत्नीसह चार महिन्यांपासून टेमणी येथे सासऱ्याकडे वास्तव्यास असल्याचे उघडकीस आले. या खून प्रकरणात पोलिसांनी सुरेश सीताराम नागरीकर व सोबती धर्मेंद्र सुधाकर मारबते (वय 23, रा. टेमणी) यांना अटक केली. 

कटंगी येथे जातो म्हणून निघाला...

मुलचंदला पत्नीच्या अनैतिक संबंधाची माहिती होती. यामुळे तो तिला सतत मारहाण करीत असायचा. सहा मे रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास तो कटंगी येथे जातो म्हणून निघून गेला होता. त्यानंतर परत आलाच नाही. या अनुषंगाने पथकाने तपास केला असता धक्कादायक बाब उघडकीस आली.

दारू पाजून कुऱ्हाडीने वार

सुरेशने प्रेयसीसोबत मिळून मुलचंदचा खून करण्याचा प्लॅन रचला. ठरल्याप्रमाणे सुरेशने धर्मेंद्रसह मुलचंदला दारू पिण्यासाठी घटनास्थळी बोलावले. तिघांनी मिळून दारू ढोसली. यानंतर सुरेशने धर्मेंद्रससोबत मिळून मुलचंदचा खून करण्याचे ठरवले. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कुऱ्हाडीने मुलचंदच्या गळ्यावर व डोक्‍यात वार करून त्याचा खून केल्याचे तपासात उघड झाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. शरद पवार, अमित शाहांनी बजावला मतदानाचा हक्क

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT