mutton and fish rates increases in gadchiroli
mutton and fish rates increases in gadchiroli 
विदर्भ

'बर्ड फ्लू'मुळे बकरे, मासे खाऊ लागले भाव, दर पाहून तुम्हालाही बसेल धक्का

मिलिंद उमरे

गडचिरोली : कोरोनाची दहशत अद्याप संपलेली नसताना बर्ड फ्लू देशात धडकला असून पोल्ट्री व्यवसाय डबघाईस आला आहे. त्यातच मांसाहाराची आवड असणाऱ्या खवय्यांनी ब्रायलर कोंबडी सोडून आपला मोर्चा मटण, मासे यांच्याकडे वळवला आहे. त्यामुळे आधीच महाग असलेले बकऱ्याचे मटण आणखी महाग झाले असून माश्‍यांचे भावही वधारले आहेत.

मागील वर्षात 2020 मध्ये मार्च महिन्यापासून जगभरात कोरोनाचा कहर सुरू झाला. आता कोरोनाची लस दाखल होत असतानाच बर्ड फ्लू नावाचा नवा आजार पक्ष्यांमध्ये सुरू झाला. आधी स्थलांतरित पक्षी मृतावस्थेत आढळले, त्यानंतर स्थानिक पक्षी मृतावस्थेत आढळू लागले. त्यानंतर या आजाराचा संसर्ग पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांमध्ये पसरला. गडचिरोली जिल्ह्यातही या आजाराचा शिरकाव झाला असून यापूर्वीच गडचिरोली शहरातील फुले वॉर्ड येथे काही कोंबड्या मृतावस्थेत आढळल्या होत्या. तेव्हा जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी या परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करत गडचिरोली शहरातील दहा किमीच्या परिसरात कोंबड्यांची विक्री, कापणे आदींना मनाई केली होती. आता काही ठिकाणी पुन्हा पोल्ट्रीच्या पांढऱ्या कोंबड्या दिसू लागल्या असल्या, तरी अनेकांमध्ये बर्ड फ्लूची भीती कायम आहे. त्यामुळे आता स्वस्त ब्रायलर कोंबड्यांऐवजी बकऱ्याचे मटण किंवा मासे खाण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. बकऱ्याचे मटण आधीपासूनच महाग आहे. बर्ड फ्लूच्या बातम्या धडकल्यानंतर हे मटण प्रतिकिलो 800 रुपयांपर्यंत विकले जात होते. आता त्याचा भाव 700 रुपये झाला आहे. त्यामुळे त्याहून स्वस्त पर्याय म्हणून मासे खरेदीकडे ग्राहक वळत आहेत. त्यामुळे अनेक विक्रेते मासे महागड्या दराने विकू लागले आहेत. रोहू, कतला, झरण, तंबू, मरळ, काटवा अशा अनेक प्रकारचे मासे बाजारात उपलब्ध आहेत. आता हे मासे दोनशे रुपयांपासून तीनशे रुपये प्रतिकिलो विकले जात आहेत. माशांच्या प्रजातीनुसार, त्यांचा दर ठरत असला, तरी पूर्वीपेक्षा हा दर वाढला आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताची असलेले ग्राहक भाजल्या मासळ्या, सुकवा (सुकवलेले छोटे झिंगे), अशा स्वस्त पर्यायांना पसंती देत आहेत. 

गावठी कोंबडीलाही पसंती -
बर्ड फ्लूमुळे पांढऱ्या ब्रॉयलर कोंबडी खाणे ग्राहक टाळत असून मटण, मासे याकडे वळले आहेत. सोबतच गावठी कोंबड्यांनाही मागणी वाढली आहे. वाढत्या शहरीकरणामुळे घरात कोंबड्या पाळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. पण, ग्रामीण भागांत अद्याप कोंबड्या पाळल्या जातात. त्यामुळे अनेक छोटे-मोठे विक्रेते गावोगाव फिरून गावठी कोंबड्या शहरात आणून विकत आहेत. या कोंबड्यांचा दरही कोंबडी चारशे ते साडेचारशे, तर कोंबडा पाचशे ते सहाशे रुपये प्रतिकिलो विकला जात आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Freedom At Midnight: 'फ्रिडम एट मिडनाइट' चा फर्स्ट लूक आऊट; जवाहरलाल नेहरूंच्या भूमिकेत 'हा'अभिनेता

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SCROLL FOR NEXT