Pradeep Titiramare
Pradeep Titiramare Pradeep Titiramare
विदर्भ

एकट्यानेच घेतले ९६ टक्के मत; विरोधकांचा सुपडा साफ करणारा आहे तरी कोण?

मोहित खेडीकर

लाखनी (जि. भंडारा) : येथील नगरपंचायत निवडणुकीत (Nagar Panchayat elections) विक्रमी मतांनी विजय मिळवून उमेदवाराने राज्याचे लक्ष वेधले आहे. प्रदीप पुरुषोत्तम तितीरमारे (Pradeep Titiramare) असे विजयी उमेदवाराचे नाव आहे.

प्रदीप तितीरमारे (Pradeep Titiramare) वयाच्या १८ व्या वर्षांपासून समाजकारणात सक्रिय आहे. प्रभागातील सर्वसामान्य माणसाला अडचणीच्या काळात आधार देण्यासाठी तो सदैव तत्पर असतो. रात्री-अपरात्री गरजू व्यक्तीला मदत करण्यासाठी प्रदीप कधीच मागे हटत नाही. त्याच्या याच स्वभावामुळे सर्वत्र लोकप्रिय आहे. कोरोना काळात गरिबांना रेशनचा पुरवठा असो की विजेचे थकलेले बिल भरण्याचे काम असो प्रदीपने कधीच पैशांचा विचार केला नाही.

शेती करून स्वतःचा व कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना प्रदीपने परिसरातील नागरिकांना कुटुंबाप्रमाणेच सांभाळले. म्हणूनच लोकांनी देखीत त्याला मतांचा आशीर्वाद देत कुटुंब प्रमुख म्हणून निवडून दिले. गरिबांचा लाडका प्रदीप वयाच्या ३४ व्या वर्षी नगरसेवक झाला, तोही राज्यातून सर्वाधिक मते मिळवून.

इतर उमेदवारांचे डिपाॅझिट जप्त

नगरपंचायत निवडणुकीत (Nagar Panchayat elections) प्रभाग क्र. नऊ मधून काँग्रेसच्या (congress) तिकिटावर प्रदीप निवडणूक रिंगणात उतरला. प्रदीप निवडणूक लढवणार असल्याचे समजतात कोणताही उमेदवार त्याच्याविरोधात निवडणूक लढवण्याची हिंमत करत नव्हता. कशीबशी इतर दोघांनी हिंमत केली पण त्यांचे डिपाॅझिट जप्त झाले.

राज्यातील एकमेव उमेदवार

९६.२१ टक्के मते घेऊन प्रदीपने (Pradeep Titiramare) एकतर्फी विजय मिळवला. मतदारांनी ४७५ पैकी ४५७ मतांचा दान एकट्या प्रदीपच्या पारड्यात टाकले. विरोधातील उमेदवारांना एकाला नऊ तर दुसऱ्याला केवळ पाच मते मिळाली. नगरपंचायत निवडणुकीत इतक्या मोठ्या प्रमाणावर मते मिळवणारा प्रदीप राज्यातील एकमेव उमेदवार ठरला आहे.

सोळा वर्षांपासून सर्वसामान्य व गरिबांची सेवा करीत आहे. मी आजवर सर्वांना कुटुंबाप्रमाणेच सांभाळले. यापुढे सर्वांची सेवा करीत राहणार आहे.
- प्रदीप तितीरमारे, नवनियुक्त नगरसेवक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT