Nagpur district has the highest number of corona patients in east  
विदर्भ

हरेल कोरोना... विभागात ७० टक्के रुग्ण नागपूर जिल्ह्यातील; मुक्तीचे प्रमाणही समाधानकारक

केवल जीवनतारे

नागपूर : नागपूर विभागातील (पूर्व विदर्भ) सहा जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूने चांगलेच हातपाय पसरले असून, सहा महिन्यांत सुमारे १ लाख २० हजारांजवळ कोरोनाबाधित आढळले आहेत. यातील सत्तर टक्के ८५ हजारांच्या आसपास रुग्ण नागपूर जिल्ह्यातील आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नागपूर विभागाने गेल्या २४ तासांत नोंदविलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत १ लाख १८ हजार ३२५ जणांना विषाणू बाधा झाली आहे. त्यापैकी ९३ हजार ३६८ जणांनी मात केली आहे. 

जवळजवळ ७० टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. एकट्या नागपूर जिल्ह्यातील ८५ हजार रुग्ण आहेत. त्यापाठोपाठ विभागाच्या अखत्यारीतील भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, अन्य ५ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत ३३, ४८० जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. हळूहळू आता कोरोनामुक्त झालेल्यांची टक्केवारी वाढत असून बाधितांचा आकडा नागपूरसह पूर्व विदर्भात घटत आहे.

नागपूरनंतर चंद्रपूरमध्ये ११ हजार ११८ तर गोंदियात ७ हजार ६६४ कोरोनाबाधित आढळले. भंडारा जिल्ह्याात ६ हजार ८७ तर वर्धा जिल्ह्यात ५ हजार ४६१ जण आढळून आले. नागपूर जिल्ह्यात कोरोनामुक्तीचा सरासरी दरही ८२ टक्क्यांवर गेला आहे. नागपूर खालोखाल विभागातील गोंदिया जिल्ह्यात आजारमुक्तीचे प्रमाण ७८ तर भंडारा जिल्ह्यात ७४ टक्क्यांवर पोचले आहे.

विशेष असे की, नागपुरात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्येत घट झाली आहे. नागपूर जिल्ह्यात सोमवारी ४८४८ चाचण्या झाल्या. कमी चाचण्या झाल्यानंतरही बाधितांची संख्या रविवारच्या तुलनेत सोमवारी सव्वाशेने वाढली आहे. ७४६ बाधित आढळून आले आहेत. दर दिवसाला शासकीय प्रयोगशाळांमधील चाचण्यांची संख्या कामी होत आहे. मात्र त्या तुलनेत खासगी प्रयोगशाळांमध्ये होणारी संख्या वाढत आहे.

सोमवारी खासगी प्रयोगशाळेत १३७० चाचण्या झाल्या आहेत. यापैकी ३९५ कोरोनाबाधित आढळले आहेत. तर मेयो, मेडिकल, माफसू, निरीसह एम्स या सरकारी संस्थांमधील प्रयोगशाळेत १२४५ चाचण्या झाल्या असून यापैकी केवळ १६१ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. तर महापालिकेत केलेल्या २ हजार ४३ रॅपिड ॲन्टेजन चाचणीतून १९० जणांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. आज जिल्ह्यात ३६ मृत्यू झाले असून यापैकी २१ मृत्यू हे शहरातील आहेत.

तर ७ मृत्यू ग्रामीण आणि जिल्हाबाहेरील ८ मृत्यू आहेत. जिल्ह्या बाहेरून रेफर झालेल्या ८ मृत्यूमुळे सोमवारी मृतकांचा टक्का वाढला आहे. तर आज बरे झालेल्या ९६५ रुग्णामुळे कोरोनामुक्तांची संख्या ६९ हजार ३४२ झाली आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्यादेखील घटली आहे. १० हजार २०६ सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची ६ हजार ५४८ आहे. उपचाराखाली ३ हजार ५५८ असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून प्राप्त झाली आहे.

शहरातील बाधितांच्या संख्येत घट

ऑक्टोबरपासून शहरात कोरोनाबाधितांची संख्येत बऱ्यापैकी घट दिसून येत आहे. एक ऑक्टोबरला शहरात ७०८ जणांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर २ ऑक्टोबरला ६३१ जण बाधित झाले. ५ ऑक्टोबरला आणखी घट झाली असून हा आकडा ४९३ वर आला आहे. ग्रामीण भागातील रुग्णसंख्या मात्र कमी अधिक होत आहे.


पूर्व विदर्भात बाधित : १,१८,३२५
पूर्व विदर्भात कोरोनामुक्त :  ९३,३६८

जिल्हानिहाय कोरोनाचे मृत्यू

  • नागपूर- २६५९
  • वर्धा-१९५
  • भंडारा- १३९
  • गोंदिया- ८६
  • चंद्रपूर- १७४
  • गडचिरोली- २१
  • जिल्ह्याबाहेरील मृत्यू- २६१

    संपादन  : अतुल मांगे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police constable molests student on train Video : रेल्वेत झोपेचं सोंग घेवून शेजारी बसलेल्या विद्यार्थीनिचा विनयभंग करणाऱ्या पोलिस कॉन्स्टेबलला अटक!

Pune News : सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीला ईपीएफओचा दणका; १२० कोटी ९० लाख रुपये पीएफ भरण्याचे आदेश!

Karad Crime : कराडमध्ये पोलिसांच्या ताब्यातील आरोपी बेड्यांसह पसार; पुणे-बंगळूर महामार्गावर खळबळ!

Aravalli Case: अरावली वाचवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय! नवीन खाण परवान्यांवर बंदी; उद्योगाला मोठा झटका

Vijay Hazare Trophy : वैभव सूर्यवंशीच्या १९० धावा; रोहित शर्माच्या १५५ अन् विराट कोहलीच्या १३१ धावा! बघा ३ शतकांचा ५ मिनिटांचा Video

SCROLL FOR NEXT