nagpur university postgraduate admission will not get extension 
विदर्भ

विद्यार्थ्यांनो, पदव्युत्तर प्रवेशाला मिळणार नाही मुदतवाढ

मंगेश गोमासे

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवी प्रवेश प्रक्रियेत शनिवारी १९ हजार १३१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. पदव्युत्तर प्रवेशाला मुदतवाढ मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले असून ९ हजार ११६ विद्यार्थ्यांनी अर्ज जमा केलेले आहेत. 

प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीमध्ये ८ अभ्यासक्रमांचे प्रवेश होणार असून यात एम.एसस्सी.च्या १६ विषयांचा समावेश आहे. याशिवाय एम.कॉम., एम.कॉम. प्रोफेशनल, एलएलएम, एसीटी, अशा अभ्यासक्रमांचा समावेश आहे. विशेष म्हणजे विद्यापीठाचे विभाग आणि संलग्नित महाविद्यालयात एम.कॉमच्या ३ हजार २०८ , एमएस.स्सी.च्या ४ हजार ९८३, तर एमए अभ्यासक्रमाच्या १० हजार ८६५ जागांचा समावेश आहे. याशिवाय एमएस.स्सी. फॉरेन्सिक सायन्स आणि एम. लिब. यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या २४० जागा आहेत. शनिवार प्रवेश नोंदणीचा शेवटचा दिवस होता. यादिवशी ३ हजार ३६८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी १ हजार ७९ विद्यार्थ्यांचे अर्जाची कागदपत्रे तपासण्यात आलीत. एकूण ३ हजार ४९८ अर्जांची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. तात्पुरती गुणवत्ता यादी १६ डिसेंबरला प्रकाशित केली जाणार आहे. 

अभ्यासक्रम जागा अर्ज निश्चिती 
एम.एसस्सी ४,९८६ २०१९ 
एम.कॉम ३,२०८ १,२२०
एम.कॉम (प्रोफेशनल) ३१९ १८८
एमसीएम १३५ ३३
एमएस.स्सी (कॉस्मेटिक) ३९ १३ 
एम. हॉस्पिटॅलिटी १५
एमआयआरपीएम १३ २ 
एलएलएम २२८ ७१ 
एमएस.स्सी (फॉरेन्सिक) ४५ १७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhule Wedding Two Killed News : लग्नसमारंभावेळी अचानक चाकू हल्ला दोघांचा मृत्यू, ३ जण गंभीर; व्हॉट्सअ‍ॅपवर आक्षेपार्ह मेसेज ठेवल्याचा प्रकार

IND vs PAK: 'आम्ही किमान भारताला वर्ल्ड कपमध्ये हरवलंय, आमच्या माजी खेळाडूंनी तेवढंही...', शाहिद आफ्रिदी, युसूफला घरचा आहेर

Latest Marathi News Live Update : चाळीसगाव शहरातील महाराणा प्रताप चौकामध्ये पोलिस अधिकारी व शिवप्रेमींमध्ये बाचाबाची

Abhishek Sharma: शून्य, शून्य, शून्य... 'सुपर ८' पूर्वी अभिषेकला मिळाला सुनील गावस्करांचा सल्ला; म्हणाले, ४ डॉट बॉल खेळले तरी चालेल...

नवऱ्याच्या हातात पोरीला देत आलिया भट्ट सासूसोबत करत होती गॉसिप, Viral Video पाहून नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT