1200 children of Bharwad community deprived of education 
नागपूर

जिल्हा परिषदेला नकोय बालरक्षक प्रशिक्षक; भारवाड समाजाची १,२०० मुले शिक्षणापासून वंचित

अतुल मांगे

नागपूर : एकीकडे शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे शासनाकडून सांगितले जाते. दुसरीकडे अशाच शाळाबाह्य मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रकार सुरू आहे. भारवाड समाजाच्या मुलांना शिकविण्यात जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना अनेक अडचणी येतात. यावर तोडगा काढण्यासाठी समाजातील शिक्षणप्रेमी व जागरूक नागरिकांनी याबाबत जिल्हा परिषदेला माहिती देऊन स्वखर्चाने शिक्षकांना बालरक्षक प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शवली. परंतु, याकडे जिल्हा परिषदेच्या शिक्षण यंत्रणेने दुर्लक्ष केल्याचे समजते.

नागपूर जिल्ह्यात भारवाड समाजाचे ३० ते ३५ बेडे आहेत. हे बेडे गावांपासून एक ते अडीच किलोमीटरच्या अंतरावर जंगलात आहेत. बेड्यांवर शून्य ते १८ वर्षे वयापर्यंतची जवळपास बाराशे मुले शाळाबाह्य आहेत. या मुलांची नावे जवळच्या शाळेत नावापुरती नोंदवली आहेत. परंतु ते शाळेत जात नाही.

त्यासाठी गावापासूनचे अंतर, ये-जा करण्याची गैरसोय यासोबतच पालकांची उदासीनता ही प्रमुख कारणे आहेत. ही बाब जिल्हा परिषदेच्या लक्षात आणून देत स्वखर्चाने शिक्षकांना बालरक्षक प्रशिक्षण देण्याची तयारी शिक्षणप्रेमींनी दर्शवली, परंतु जिल्हा परिषदेच्या शिक्षण यंत्रणेला याकडे लक्ष देण्यासाठी वेळच नसल्याचे बालरक्षक प्रसेनजित गायकवाड यांनी सांगितले. 

शाळाबाह्या मुलांना शाळेत कसे आणावे, त्यांच्या अडचणी कशा समजून घ्याव्या, त्यांना शाळेत टिकवून कसे ठेवावे, त्यांच्या पालकांचे, शिक्षकांचे समुपदेशन कसे करावे यासंबंधाने शिक्षकांना बालरक्षक प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. केवळ भारवाड नवे तर नागपूर जिल्ह्यात भरवाड रब्बारी, गोसावी, नाथजोगी, सरोदी, मांगगारोडी या समूहांची मुले मोठ्या प्रमाणात शाळाबाह्य आहेत.

यासंबंधाने काम होणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेत बालरक्षक समन्वयक पद देणे गरजेचे आहे. याबाबत जि.प.ला पत्रही देण्यात आले. ही बाब पालकमंत्री नितीन राऊत यांच्या लक्षात आणून दिली असून, त्यांनीही सकारात्मकता दाखविल्याचे बालरक्षक प्रसेनजित गायकवाड यांनी सांगितले. 

शिक्षकांना बालरक्षक प्रशिक्षण देणे आवश्यक
शाळाबाह्या मुलांना शाळेत आणण्यासंदर्भात मी यंत्रणेला वारंवार माहिती दिली व त्यांच्यासाठी काम करण्याचा कार्यक्रमही दिला. परंतु जि.प. शिक्षण विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले. शाळाबाह्य मुलांना शाळेत कसे आणावे, त्यांच्या अडचणी कशा समजून घ्याव्या, त्यांना शाळेत टिकवून कसे ठेवावे, त्यांचे पालक शिक्षकांचे समुपदेशन कसे करावे, यासंबंधाने शिक्षकांना बालरक्षक प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. यासाठी एससीईआरटी पुणे समता विभाग यांनी पूर्ण प्रशिक्षित केलेल्या प्रशिक्षकाची मदत घेणे गरजेचे आहे, परंतु तसे केले केले गेले नाही. 
- प्रसेनजित गायकवाड,
बालरक्षक

मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील
सध्या बालमणी नंदाला या डायटला बालरक्षक म्हणून काम करीत आहेत. शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणासंदर्भात कोणताही प्रस्ताव असेल तर त्याचे स्वागतच आहे. भारवाडच नव्हे तर इतरही भटक्या समाजाच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. 
- चिंतामण वंजारी,
शिक्षणाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT