4 years daughters died due to hot water in nagpur 
नागपूर

हृदयद्रावक! खेळता-खेळता स्वयंपाकघरात पोहोचली, आई गंSSS ओरडली अन् सोडला जीव

अनिल कांबळे

नागपूर : आंघोळीसाठी पाणी गरम करीत असताना चार वर्षीय चिमुकली खेळताना उकळत्या पाण्याच्या भांड्यावर पडली. यामध्ये भाजून चिमुकलीचा अंत झाला. ही दुर्दैवी घटना एमआयडीसीतील भीमनगरात उघडकीस आली. सोनाक्षी सुनील उईके, असे मृत्यू पावलेल्या चिमुकलीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील मोहनलाल उईके हे कुटुंबासह हिंगणा रोडवरील भीमनगरात राहतात. ते खासगी काम करतात. त्यांच्या पत्नीने ३ जानेवारीला सकाळी सहा वाजता शेगडीवर पाणी गरम करण्यासाठी ठेवले होते. त्यांची एकुलती एक चार वर्षांची मुलगी सोनाक्षी ही घरात खेळत होती. खेळताना ती शेगडीजवळ पोहोचली. शेगडीजवळील खिडकीत असलेली खेळणी काढण्याचा प्रयत्न सोनाक्षी करीत होती. ती प्लास्टिकचा डब्यावर चढली. तिचा पाय घसरला. त्यामुळे ती थेट उकळत्या पाण्याच्या भांड्यावर पडली. या अपघातात सोनाक्षी होरपळली. पडल्याचा आवाज ऐकून तिच्या आईने घरात धाव घेतली. लगेच सोनाक्षीला लता मंगेशकर रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान १० जानेवारीला सोनाक्षीचा मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हे पवारांचं जंतरमंतर...! राज ठाकरेंनी तीन वर्षांपूर्वीची पोस्ट काढत डिवचलं, नेमकं काय म्हटलं?

Marathi News Live Updates: शिवसेना ही एनडीएची सर्वात जुनी आणि विश्वासू सहकारी - एकनाथ शिंदे

Winter Asthma Care: दम्याचा त्रास असणाऱ्यांनो, हिवाळ्यात निष्काळजीपणा नको! 'या' ६ गोष्टी लक्षात ठेवा

UK Student Visa: ३० नोव्हेंबरपासून व्हिसाचे नियम बदलणार; भारतीय विद्यार्थ्यांनी तपासावी बँक खात्यातील रक्कम

Delimitation Bill: मतदारसंघ पुनर्रचनेवरून अमित शाह यांचा उत्तर प्रदेशला मोठा संदेश; किती जागा वाढणार तेही सांगितलं...

SCROLL FOR NEXT