corona update sakal
नागपूर

नागपूर : ४०२८ नवे कोरोनाबाधित

सहा मृत्यू; जिल्ह्याबाहेरील ८ हजार ४१९ बाधितांची नोंद

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप वाढत असतानाच प्रशासनाकडून बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून त्यांच्या चाचण्यांवर भर दिला जात आहे. मात्र त्याच तुलनेत जिल्हा बाहेरून येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मंगळवारी (ता.२५) जिल्ह्यात ४ हजार २८ नव्या बाधितांची १०० बाधित जिल्ह्याबाहेरचे आहेत. आतापर्यंत जिल्ह्याबाहेरच्या साडेआठ हजार बाधितांची नोंद नागपुरात झाली. सध्या जिल्ह्याबाहेरील ३३७ बाधित नागपुरात उपचार घेत आहेत.

तिसऱ्या लाटेत जिल्ह्यात १९ जानेवारीपासून मृत्युसत्र सुरू आहे. मंगळवारी सहा जण दगावले. यामुळे बाधितांची मृत्युसंख्या १० हजार १८३ झाली. तिसऱ्या लाटेत अवघ्या पंधरा दिवसात ६१ जण दगावले. मागील दोन दिवसांपासून दररोज ११ हजार चाचण्या होत आहे. मंगळवारी झालेल्या ११ हजार ३७७ चाचण्यांमध्ये ४ हजार २८ जण बाधित आढळले. यामुळे आतापर्यंतचा कोरोनाबाधितांचा आकडा ५ लाख ४३ हजार ६४ वर पोहोचला. सध्या जिल्ह्यात २९ हजार १५२ सक्रिय कोरोनाबाधित आहेत. यात शहरातील २२ हजार १४६ तर ग्रामीणमध्ये ६ हजार ६६९ आहे. जिल्ह्याबाहेरील ३३७ जण जिल्ह्याबाहेरचे आहेत. २३८८७ कोरोनाबाधित गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

कोरोनाचे तिसऱ्या लाटेतील मृत्यू

  • ११ जानेवारी - १

  • १२ जानेवारी - १

  • १३ जानवारी - १

  • १४ जानेवारी - ३

  • १५ जानेवारी - १

  • १६ जानेवारी - ३

  • १७ जानेवारी - ४

  • १८ जानेवारी - ०

  • १९ जानेवारी - ५

  • २० जानेवारी - ६

  • २१ जानेवारी - ७

  • २२ जानेवारी - ८

  • २३ जानवारी - ९

  • २४ जानेवारी - ६

  • २५ जानेवारी - ६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambajogai Robbery Case : अंबाजोगाईतील 'हायप्रोफाईल' घरफोडीचा एलसीबीकडून छडा; फरार म्होरक्याला बेड्या, कोट्यवधींचा ऐवज जप्त

Otur News : खासगी क्लासेसवर अंकुश कोणाचा? कठोर पावले उचलण्याची गरज

Asian Games: शेवटच्या दिवशी ५ GOLD! कुमकुम, अमन, प्रणवीपाठोपाठ हॉकी-क्रिकेट संघांची सुवर्ण कामगिरी; भारताच्या खात्यात ८५ मेडल्स

Beed News : उच्च पगाराचे आमिष! म्यानमारच्या सायबर नरकात अडकल्या ३२ मराठी जिवांची होणार सुटका; बीडच्या स्वप्नील काळुंकेसह भारतीयांसाठी म्यानमार सरकार करणार 'रेस्क्यू ऑपरेशन'

Pune News : पुणे शहरातील २४ संवेदनशील ठिकाणी अंधाराचे साम्राज्य

SCROLL FOR NEXT