67th dhamma chakra day samrat ashoka statue at dikshabhumi nagpur Sakal
नागपूर

Nagpur News : सम्राट अशोकांचा पुतळा येणार दीक्षाभूमीवर; कर्नाटकातून २५ हजार अनुयायी होणार दाखल

दीक्षाभूमी येथे ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे आयोजन २४ ऑक्टोबरला आहे

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : दीक्षाभूमी येथे ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे आयोजन २४ ऑक्टोबरला आहे. या धम्मचक्र प्रवर्तन दिनावर सम्राट अशोक यांचा पुतळा दीक्षाभूमीवर आणण्यात येत आहे. याठिकाणी कर्नाटकातून २५ हजार अनुयायी दीक्षाभूमीवर येणार असून हजारो व्यक्ती धम्म दीक्षा घेणार आहेत.

तामिळनाडू येथील बुद्धीस्ट फॅटरनिटी मुव्हमेंट यांच्याकडून हा पुतळा तयार करण्यात आला असून दीक्षाभूमीला भेट देण्यात येणार आहे. हा भव्य असा पुतळा आहे. केरळ राज्यातील मुनदकयाम येथून एक धम्म यात्रा निघाली आहे.

ही यात्रा तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणामार्गे दीक्षाभूमीवर येणार आहे. तामिळनाडूतील बुद्धीस्ट फॅटरनिटी मुव्हमेंट या यात्रेत सहभागी झाली असून सम्राट अशोक यांचा पुतळाही याच यात्रेसोबत आणण्यात येत आहे.

यात्रेदरम्यान सर्व ठिकाणी संविधान, बुद्ध ॲण्ड हिज धम्म व सम्राट अशोक यांची छोटी प्रतिमा भेट देण्यात येत आहे. ही यात्रा २१ ऑक्टोबरला नागपुरात दाखल होईल. दीक्षाभूमीवर आल्यावर सम्राट अशोक यांचा पुतळा दीक्षाभूमी स्मारक समितीला भेट देण्यात येणार आहे.

कर्नाटकातून येणार २५ हजार अनुयायी

धम्मदीक्षा दिनाच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी कर्नाटक राज्यातून २५ हजार अनुयायी येणार असून बुद्ध धम्माची दीक्षा घेणार असल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT