90 percent and more Farmers till not get Crop Insurance in Nagpur  
नागपूर

तब्बल ९० टक्क्यांपेक्षा अधिक शेतकरी अजूनही पीक विम्यापासून वंचित; अवघ्या ३७६३ जणांना लाभ 

निलेश डोये

नागपूर : नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक सरंक्षण देण्यासाठी पीम विमा योजना सुरू केली. परंतु ही योजना शेतकऱ्यांपेक्षा कंपनीची फायद्याची असल्याचे आरोप झालेत. गेल्या वर्षी नागपूर जिल्ह्यात १० टक्काही शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे या योजनेवरील शंकेला बळ मिळाले आहे. 

अतिवृष्ट्री, पूर, किडीमुळे पिकांची मोठी हानी होते. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. त्यांच्यावर कर्जाचा बोझा वाढतो. कर्जातून अनेक शेतकऱ्यांना आत्‍महत्येचे पाऊल उचलले आहे. नुकसानासाठी शासनाकडून मदत करण्यात येते. परंतु ही मदत अतिशय तोकडी असते. शिवाय ती मिळण्यासही विलंब होतो. त्यामुळे केंद्र सरकारकडून पीक विमा योजना सुरू करण्यात आली.

कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही योजना पुर्वी सक्तीची होती. आता एच्छीक करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना याचा फारसा लाभ होत नाही. त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांपेक्षा कंपन्याच्या हिताची असल्याचे आरोप झालेत. कंपनीला मिळणाऱ्या विमा हप्त्याच्या तुलनेत शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम कमी असते. 

नागपूर जिल्ह्यात वर्ष २०१९-२० मधील खरीप हंगामात ५१ हजार १५५ शेतकऱ्यांनी ५२ हजार ७९८ हेक्टरसाठी ७ कोटी १९ लाख ५ हजार रुपये भरले. ५१ हजार १५५ शेतकऱ्यांच्या तुलनेत १० टक्केपेक्षा कमी म्हणजे ३७६३ शेतकऱ्यांच विमा लाभ मिळाला. रब्बी हंगामात तर एकही शेतकऱ्याला लाभ मिळाला नाही. रब्बीसाठी ३५७७ शेतकऱ्यांनी १ कोटी ७० लाख ४६ हजार रुपये भरले होते.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akole News: उन्हाच्या झळांनी घेतला जीव; अकोले तालुक्यातील शेतकरी कोसळून मृत, ४१ अंश तापमानात दुर्दैवी घटना..

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत उष्णतेचा फटका! यलो अलर्ट, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक धोक्यात

रस्त्याच्या कामाच्या बिलावर २ टक्के मागणी, लाच घेताना ZP इंजिनिअरसह ३ अधिकाऱ्यांना अटक

Mahad Chavdaar Tale: इतिहास जागा झाला! चवदार तळ्यातील ११ विहिरींचे दर्शन, ऐतिहासिक लढ्याच्या साक्षीदारांना पाहण्यासाठी गर्दी..

Medical College: ‘सिव्हिल’ आता होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय: ४४८ पदांसाठी अध्यादेश, पुढच्या वर्षी पहिल्या बॅचचे ॲडमिशन

SCROLL FOR NEXT