900 and above children are facing Malnutrition in Nagpur district
900 and above children are facing Malnutrition in Nagpur district  
नागपूर

धक्कादायक! तब्बल नऊशेवर बालक कुपोषणाच्या छायेत; नागपूर जिल्ह्यातील वास्तव 

निलेश डोये

नागपूर : नागपूर जिल्ह्यात ९०२ बालके कुपोषणाच्या छायेत आहेत. यात मध्यम तीव्र कुपोषित (मॅम) ७२६ व अतितीव्र कुपोषित (सॅम) १७२ बालकांचा समावेश आहे. जुलै २०२० च्या तुलनेत ऑक्टोंबरमध्ये कुपोषित बालकांची स्थिती घटल्याचे दावा महिला व बाल कल्याण विभागाचा आहे.

जुलै २०२० मध्ये मध्यम तीव्र कुपोषित (मॅम) १४१७ आणि अति तीव्र कुपोषीत ४२९ (सॅम) अशी तब्बल १८४६ बालके कुपोषित होती. यात घट होऊन ही संख्या ९०२ वर आलीआहे. कुपोषण कमी करण्यासाठी या बालकांना बालविकास केंद्राच्या माध्यमातून एनर्जी डेन्स न्यूट्रेशन फुड (ईडीएनएफ) आहार देण्यात येतो. 

अंगणवाड्यांमध्ये एकात्मिक बाल विकास योजनेच्या माध्यमातून त्यांचे कुपोषण दूर करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येते. त्यांना पोषण अहार दिला जातो. जिल्ह्यात २४२३ अंगणवाड्या कार्यरत आहेत. 

यात १ लाख ४१ हजारावर २८५ बालकांचे पूर्व प्राथमिक शिक्षणाबरोबरच त्यांचे पोषण केले जाते. कोरोनामुळे जिल्ह्यात मार्च महिन्यापासून अंगणवाड्या बंद करण्यात आल्या आहे. पण बालकांना पोषण आहाराच्या रुपात कडधान्य त्यांच्या घरी जावून पुरविले जात आहे. असे असले तरी जुलै महिन्यात घेतलेल्या बालकांच्या आढाव्यात कुपोषित मुलांची ही संख्या आता घटली असल्याचे दिसून येत आहे.

मुलांना कडधान्याचे वितरण

कोरोनामुळे अंगणवाडीत पूर्व प्राथमिक शिक्षण बंद असले तरी, मुलांचे वजन, सीबीई कार्यक्रम व पोषण आहाराचे वितरण सुरू आहे. पूर्वी अंगणवाडीत शिजलेला आहार येत होता. पण मार्चपासून अंगणवाडी बंद असल्याने कडधान्य येत आहे. यात चणा डाळ, मसुर डाळ, तिखट, हळद, तेल, गहू आदींचा समावेश आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 02 मे 2024

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT