बिपीन रावत Esakal
नागपूर

नागपूर : शिवरायांच्या गनिमी काव्याचा अवलंब करणारा योद्धा

सूर्यकांत चाफेकरः बिपीन रावत यांचा होता चीन,पाकवर वचक

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांची युध्द पद्धती जगभरातील लढवय्यांसाठी प्रेरणास्थान ठरली आहे. दिवंगत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत हेही शिवरायांच्या गनिमी काव्याचे अभ्यासक होते. एवढेच नव्हे तर त्यांनी लढाईतही गनिमी काव्याचा अवलंब केला. सर्जिकल स्ट्राईकसह कित्येक मोहिमा फत्ते केल्या. चीन व पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्रांवर वचक निर्माण केला. अशा या शुर योद्ध्याचे अचानक जाणे मोठा धक्का असल्याचे एअर व्हाईस मार्शल (सेवानिवृत्त) सूर्यकांत चाफेकर यांनी म्हटले आहे.

‘लष्करप्रमुख असताना तिन्ही दलांचे एकत्रिकरण व्हावे, अशी त्यांची मनापासून इच्छा होती. त्यामुळे सुसूत्रीकरणासोबतच देशाची सुरक्षितता व ताकदही वाढणार होती. २०१६ मध्ये लष्करप्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर रावत यांच्याकडे सीडीएसची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली होती. ते देशाचे पहिले सीडीएस होते. मृत्यू येईपर्यंत त्यांनी आपली जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे व यशस्वीरित्या पार पाडली. खरं तर त्यांना भेटण्याची मला एकदाच संधी मिळाली होती’ असे चाफेकर यांनी सांगितले.

रावत यांच्या योगदानाबद्दल बोलताना चाफेकर म्हणाले की, सीडीएस असताना रावत यांनी अनेक चांगली कामे केलीत. विशेषतः सर्जिकल स्ट्राईक आणि डोकलाम व गलवानमध्ये चीनला बॅकफूटवर ढकलण्यात त्यांचे फार मोठे योगदान होते. शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याने ते खूप प्रेरित झाले होते. सर्जिकल स्ट्राईक याच नीतीचा भाग होता. अडीच वर्षांचा काळ तसा खूप कमी होता. मात्र या अल्प कालावधीतही त्यांनी आपली छाप सोडली. रावत यांनी स्वतःला देशासाठी वाहून घेतले होते. त्यांचा अपघाती मृत्यू तमाम देशवासींसाठी फार मोठा धक्का आहे.

चीन,पाकचे संकट असताना रावत यांचा मृत्यू धक्का

देश बिकट प्रसंगातून जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. कारण सध्या भारतासमोर चीन व पाकिस्तानचे मोठे आव्हान आहे. शिवाय देशांतर्गत अडचणीदेखील आहेत. त्यामुळे नव्या सीडीएसपुढे त्यांचे काम पुढे नेण्याची मोठी जबाबदारी राहणार आहे. नवे सीडीएस रावत यांचे काम तेवढ्याच प्रामाणिकपणे पुढे नेऊन देशाला आणखी सुरक्षित करतील, अशी आशा चाफेकर यांनी यावेळी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautami Patil: अपघातावेळी गौतमी पाटील गाडीमध्ये होती का? पुणे पोलिसांनी तपासले शंभर सीसीटीव्ही

Bernard Julien Passes Away : वर्ल्ड कप विजेत्या अष्टपैलू खेळाडूचे निधन; फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या डोक्याचा वाढवलेला ताप

पूरग्रस्त भागाचा दौऱ्यावेळी भाजप खासदार-आमदारावर हल्ला, रुग्णालयात उपचार सुरू

Diwali 2025 Home Makeover: दिवाळीपूर्वी घराला रंग देताय? मग वास्तूनुसार 'या' शुभ रंगांची करा निवड

Latest Marathi News Live Update : नागपूरच्या सह दुय्यम निबंधक कार्यालयावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अचानक छापा

SCROLL FOR NEXT