Abuse of a young woman by a third party 
नागपूर

तृतीयपंथीयाने केले युवतीचे लेंगिक शोषण

अनिल कांबळे

नागपूर : तृतीयपंथीयाने आर्किटेक्ट युवतीला ब्लॅकमेल करून लेंगिक शोषण केल्याची घटना घडली आहे. प्रतापनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनीष (३२) हा हिंगणामध्ये राहतो. २२ वर्षांची युवती आर्किटेक्ट आहे. तिची वर्षभरापूर्वी मनीषसोबत गरबा खेळताना ओळख झाली होती. मनीषच्या भाच्याचा वाढदिवस असल्यामुळे त्याने फेब्रुवारीत तिला आपल्या घरी बोलाविले होते. त्याने तिची कुटुंबीयांशी ओळख करून दिली होती.

भोजनानंतर कोल्ड ड्रिंक घेतल्यावर तिला झोप येत होती. झोप येत असल्यामुळे मनीषच्या आईने तिला आपल्या मुलीच्या खोलीत झोपण्यास सांगितले. दीड तासानंतर जाग आली असता तिला त्रास होत होता. त्यानंतर तिचे मनीषसोबत बोलणे सुरू होते. एके दिवशी ती मनीषच्या हिंगणा येथील कार्यालयात गेली. तेथे तुषार घागरे उपस्थित होता.

मनीषने तिच्यासोबत शारीरिक संबंध करण्याची इच्छा व्यक्त केली. तिने नकार दिल्यानंतर मनीषने व्हिडीओ क्लिप दाखविली. ही क्लिप त्याने घरी अत्याचार केल्यानंतर तयार केली होती. व्हिडिओ क्लिप पाहून तिला धक्का बसला. मनीषने शारीरिक संबंध ठेवल्यानंतरच ती क्लिप डिलीट करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देऊन तो आपल्या कार्यालयात सेक्स टॉयच्या मदतीने तिच्याशी शारीरिक संबंध करीत होता.

एप्रिलमध्ये युवतीला तो तृतीयपंथी असल्याची माहिती मिळाली. मनीषकडे व्हिडिओ क्लिप असल्यामुळे तिला त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवावे लागले. नुकतेच युवतीचे लग्न ठरले आहे. त्याची माहिती मिळाल्यामुळे मनीष चिडला. त्याने तिला तुझे लग्न होऊ देणार नाही अशी धमकी दिली. साखरपुडा झाल्यानंतर मनीष तिच्या होणाऱ्या पतीच्या घरी पोहोचला. त्याने तिच्या होणाऱ्या पतीला फोटो दाखवून आमचे नाते असल्याची माहिती दिली.

दोघांची एकमेकांविरुद्ध तक्रार

युवती कुटुंबीयांसोबत त्याला समजविण्यासाठी त्याच्या घरी गेली. त्यामुळे चिडलेल्या मनीष आणि तुषार घारगे यांनी युवतीविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. युवतीने मनीष आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध प्रतापनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी मनीषविरुद्ध अनैर्गिक कृत्य, धमकी देणे तसेच बदनामी करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या मते व्हिडिओ क्लिप तयार करणे तसेच ब्लॅकमेल करण्यात सर्वच समाविष्ठ आहेत. पोलिसांनी सध्या मनीषलाच आरोपी केले आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT