acb many trap goes failed in maharashtra nagpur news 
नागपूर

एसीबीचे बरेच ट्रॅप फेल, एसीबीच्या कर्मचाऱ्यांवर मरगळ; राज्यातील दबदबाही झाला कमी

अनिल कांबळे

नागपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच क्षेत्र प्रभावित झाले असताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे कामही थंडावल्याचे आकडेवारीवरुन पुढे आले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कारवाईचे प्रमाण घटलेले आहे. सर्वाधिक कारवाई होणाऱ्या पोलिस विभागावरील ट्रॅप थोडा ढिला झालेला आहे. त्यामुळे एसीबीच्या कार्यपद्धतीवर संशयाचे मळभ पसरले आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा जरब कमी झाला आहे. परिणामतः लाच घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. प्रत्येक शासकीय कार्यालयातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लाच दिल्याशिवाय काम केल्या जात नाही. फाइल अडकवून ठेवण्याचे प्रकार सर्रास सुरू असून सामान्य नागरिक शासकीय कामकाजाच्या पद्धतीला कंटाळले आहेत. दुसरीकडे मात्र एसीबी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर मरगळ आल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या काळात सर्वच शासकीय कामे बंद होती. त्यामुळे लाचखोरांच्या खिशाला झळ बसली. कमाई न झाल्यामुळे अनेक लाचखोर कर्मचारी-लिपिक निराश झाले होते. आता शासकीय कामकाज पूर्ववत सुरू झाल्यामुळे लाचखोरांच्या तोंडाला पाणी सुटले आहे. त्यामुळे मिळेल त्याच्याकडून लाच खाण्याचा धडाका सुरू झाला आहे. यावर्षी नागपूर परिक्षेत्रात ९ सापळे रचले गेले आहेत, तर पुण्यात १८, नाशिकमध्ये १४ तर औरंगाबादमध्ये ११ सापळे रचण्यात आले आहेत. गेल्या वर्षी जानेवारीत ७६ सापळे करण्यात आहे होते. १०९ आरोपींना अटक करण्यात आली होती, तर यावर्षी मात्र ७२ सापळे रचण्यात आले असून १०० लाचखोर आरोपींना अटक करण्यात आली. 

प्रसिद्धीची वाणवा - 
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जनजागृती करण्यास मागे पडत आहे. त्यामुळे सर्वसामान्यापर्यंत कर्मचाऱ्यांनी लाच मागितल्यास कोणाकडे तक्रार करायची याबद्दल माहिती नसते. तसेच तक्रार कुठे तक्रार करावी? कशी करावी? इत्यादी बद्दल जनजागृती होत नसल्याने अनेकजण लाच देऊन काम करून घेतात. त्यामुळे नागरिकांच्या जनजागृतीसाठी शासकीय कार्यालयात बॅनर, पोस्टर्स किंवा भित्तिपत्रक लावायला पाहिजे. 

ट्रॅप फेलची चर्चा - 
पोलिस दलातील एका 'थ्री स्टार' अधिकाऱ्यावर एसीबी ट्रॅप लावण्यात आला होता. मात्र, वेळीच टीप मिळाल्यामुळे तो ट्रॅप फेल झाल्याची चर्चा आहे. या प्रकरणात एक ऑडिओ क्लिपसुद्धा व्हायरल झाली होती. ट्रॅप फेल झाल्यामुळे कुंपणच शेत खात असल्याचा संशय बळावला आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोनं–चांदीचा नवा उच्चांक! ५ दिवसांत तब्बल २०,००० रुपयांची वाढ; पाहा तुमच्या शहरातील आजचा भाव

How to Reach NMIA : नवी मुंबई विमानतळ आजपासून सुरु… पण Airport वर पोहोचण्यासाठी सर्वोत्तम-जलद मार्ग कोणता?

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात थंडी गायब होणार, कसा असेल हवामान अंदाज

Solapur News: सुंच आठ वर्षांपासून चालवत होता किडनी विक्रीचे रॅकेट; एका किडनीमागे सव्वा कोटी, मुलीच्या वडिलांनीही दिला होता नकार!

Viral Video : रोहित भाऊ, वडापाव खाणार का? प्रेक्षकांमधून मिळाली आवडत्या पदार्थाची ऑफर; भारी होती हिटमॅनची रिअ‍ॅक्शन

SCROLL FOR NEXT