Acid attack  sakal media
नागपूर

नागपूर : रामेश्वरीत पतीने पत्नीच्या चेहऱ्यावर फेकले ॲसिड

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : पतीने पत्नीच्या तोंडावर ॲसिड (Acid attack) फेकून जखमी केल्याची घटना अजनी पोलिस ठाण्याअंतर्गत काशीनगर, रामेश्वरी येथे सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली. महिलेला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (मेडिकल) दाखल केले असून, डॉक्टर उपचार करीत आहे. सुरेश झेंगटे (४२) असे आरोपी पतीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती सुरेश झेंगटे (४२) व पत्नी हे रामेश्वरीमध्ये राहतात. तीन वर्षांपासून त्यांच्यात वाद सुरू आहे. त्यांना १२ वर्षांची मुलगी आणि दहा वर्षांचा मुलगा आहे. पत्नी ही शनिवारी सकाळी ९.३० वाजता सायकलने पोळ्या करण्याच्या कामासाठी जात होती. काशीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकीवर आलेल्या सुरेशने मंजुळा प्लाझा बिल्डिंगच्या बाजूला पत्नीच्या चेहऱ्यावर ग्लासमध्ये भरून आणलेले अॅसिड फेकले. यात ती जखमी झाली.

आजूबाजूच्या नागरिकांनी तिला उपचारासाठी मेडिकलमध्ये दाखल केले. ॲसिड (Acid attack) फेकल्यानंतर सुरेश दुचाकीने फरार झाला. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍त नवीनचंद्र रेड्डी, पोलिस उपायुक्त नुरुल हसन, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त चिन्मय पंडित आणि अजनी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपी पतीचा (Husband absconding) शोध सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI चा मोठा निर्णय! एकदिवसीय क्रिकेटला नवा आकार; प्लेट ग्रुप सिस्टीम लागू, नेमका बदल काय होणार?

Latest Marathi News Updates : इचलकरंजीत घराची भिंत कोसळल्याने पाचजण जखमी

Raj Thackeray in Pune :राज ठाकरेंनी पुणे महापालिका निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांना दिला कानमंत्र!

Mangalwedha News : वाचन संस्कृती टिकवण्यासाठी प्राथमिक शिक्षकाची परभणी-कोल्हापूर सायकल यात्रा

Donald Trump: देशात आता 'स्वदेशी जागरण अभियान'; भाजपचा पुढाकार, 'ट्रम्प टॅरिफ'ला देणार उत्तर

SCROLL FOR NEXT